politics : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून सध्या महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. दसरा मेळाव्याचे हे प्रकरण कोर्टापर्यंत गेल्यानंतर आता दसरा मेळाव्यात सर्वाधिक गर्दी कोणाची जमते? यावरून दोन गटांमध्ये स्पर्धा सुरू आहे. एकीकडे बीकेसी मैदानावर शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. तर दुसरीकडे नेहमीप्रमाणे शिवसेनेचा दसरा मेळावा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवतीर्थावर होणार आहे.
दसरा मेळाव्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, वेगवेगळ्या जिल्ह्यातून, तालुक्यातून येणाऱ्या सामान्य शिवसैनिकांसाठी प्रवासाची व्यवस्था आमदारांकडून केली जात आहे. तसेच मोठ्या संख्येने लोकांना दसरा मेळाव्यात घेऊन येण्यापासून त्यांच्या जेवणापर्यंतची सगळी व्यवस्था आमदार, खासदार करत आहेत. अशाप्रकारे आपलाच खरा दसरा मेळावा. हे ठसवण्यासाठी मोठी गर्दी जमवण्याचे प्रयत्न शिंदे गटाकडून सुरू आहेत.
शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याला आदल्या रात्रीच जे लांबून पोहोचणार आहेत. अशा कार्यकर्त्यांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. दसरा मेळाव्याच्या दिवशी बीकेसीवर असणाऱ्या सर्वांसाठी फूड पॅकेट्स वाटप केले जाणार आहे. तसेच नंतर त्यांच्या रात्रीच्या जेवणाची पुन्हा व्यवस्था आहे.
या सगळ्या शिंदे गटाच्या तयारीबाबत उद्धव ठाकरे समर्थक शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. ‘५० खोक्यांच्या लुटीचेच फूड पॅकेट्स आहेत. त्याचे वाटप होत आहे. मात्र विचारांचं खरं सोनं शिवतीर्थावरच मिळणार,’ असं खासदार विचारे म्हणाले.
राजन विचारे यांनी अशा प्रकारे शिंदे गटाने दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांच्या भोजन व्यवस्थेपासून प्रवासापर्यंत केलेल्या अमाप खर्चावर नेमकेपणाने बोट ठेवत खोचक टीका केली. राजन विचारांच्या या टीकेवर शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया येते? हे मात्र पहावे लागेल.
बीकेसीवर जमलेल्या हजारो कार्यकर्त्यांसाठी शिंदे गटाकडून प्रशांत कॉर्नर या ठाण्यातील दुकानाला तब्बल दोन ते अडीच लाख फूड पॅकेट्स ऑर्डर देण्यात आली आहे. यामध्ये दोन धपाटे, गुलाबजाम, कचोरी असे सगळे पदार्थ असणार आहेत. दसरा मेळाव्यासाठी जमणाऱ्या शिवसैनिकांच्या सगळ्या व्यवस्थेचे नियोजन प्रताप सरनाईकांकडे देण्यात आल्याचे समजते.
महत्वाच्या बातम्या-
marriage: आजोबा रॉक्स! ६० वर्षांनी लहान मुलीसोबत केलं लग्न, ३ वर्षे लिव्ह इनमध्ये राहिले, वाचून अवाक व्हाल
MNS : ‘टोमणे मेळाव्याची तयारी सुरू..मर्द छाताड, खंजीर, कोथळा, बॉम्ब, बाप पळवणारी टोळी’
Congress : अंधेरी पोटनिवडणूकीत काॅंग्रेस शिवसेनेला पाठींबा देणार का? पटोलेंनी जाहीर केली भूमिका