मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये राहणारा चहावाला अचानक करोडपती बनल्याचे समोर आले आहे. या चहावाल्याच्या बँक खात्यावर तब्बल 5 कोटी रुपये जमा झाले आहेत. परंतु या मागचे सत्य काही वेगळेच आहे. मध्यंतरी चहा विक्रेता राहुल मालवीय याला काही लोकांनी फनी रील्स आणि रिअल इस्टेटचे काम सांगत महिन्याला 25 हजार कमवून देण्याचे आमिष दाखविले होते.
यानंतर या लोकांवर विश्वास ठेवत राहुलने रील बनविण्याचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. पुढे जाऊन राहुलला इंदूरमधील एका हॉटेलमध्ये तब्बल 7 दिवस ठेवण्यात आले. मुख्य म्हणजे यावेळी त्याची 4 बँक खाते उघडली गेली. पुढे जाऊन राहूल 7 दिवसांसाठी उजैनला आला. इथून त्याने आपल्या कामाला सुरुवात केली.
काही काळातच राहूलच्या खात्यावरुन लाखोंचे व्यवहार होऊ लागले. याची माहिती राहुलला लागताच त्याने आपल्याला ट्रेनिंग देणाऱ्या लोकांशी संपर्क साधला. यावेळी त्या लोकांनी राहुलला तुला ही यातील पैसे लागत असतील तर वापर असे सांगितले. हे ऐकून राहुलने आपल्यासाठी 18 लाखांचे एक घर घेतले.
या घरात राहुल आपल्या आईसोबत राहू लागला. परंतु थोड्या दिवसातच त्याचा त्रास आणखीन वाढला. राहुलच्या खात्यावरुन मोठया रक्कमेचे व्यवहार होई लागले. याची संख्या बघता ती 90 लाखांवर येऊन पोहचली. हळूहळू राहुलच्या खात्यात 5 कोटी जमा झाले. ही रक्कम पाहून राहुलला ही घाम फुटला.
शेवटी हे प्रकरण काय आहे हे पाहण्यासाठी राहुलने पोलिसांची मदत घेतली आहे. एसएसपी सत्येंद्र कुमार शुक्ला यांनी याप्रकरणी तपास सीएसपी हेमलता अग्रवाल यांच्याकडे सोपवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुलला मागील वर्षी सौरभ नावाचा एक व्यक्ती चहाच्या टपरीवर भेटला होता. राहुल एका डोळ्याने पाहू शकत नाही. तसेच तो भोळा असल्याचे समजताच सौरभने त्याचा फायदा घेतला.
सौरभनेच राहुलला कामासोबत पैशांचे अमिष दाखवले. तसेच रील्स बनवणे आणि रिअल इस्टेट सोशल मीडियावर टाकण्याचे काम तुला जमेल असे राहुलला सांगितले. यावर राहुलने विश्वास ठेवला. सौरभ नक्की कोणता व्यवहार करत आहे. यात किती लोक सहभागी आहेत. हे अद्याप पोलिसांना समजलेले नाही.
परंतु हे एक मोठे रॅकेट असल्याचा संशय पोलिसांनी वर्तविला आहे. आपण एका मोठ्या जाळ्यात अडकलो असल्याची माहिती राहुलला समजात त्याची देखील निराशा झाली आहे. सध्या राहुल पोलिसांना आरोपींना पकडण्यास मदत करत आहे. यासाठी त्याने आपले बँक खातेही पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या
या अभिनेत्रींची आई होण्याची इच्छा अजूनही आहे अपुर्ण, वाचा अभिनेत्रींचे पडद्यामागचे दु:ख
६ रुपयांच्या या छोट्या स्टॉकने दिला ७६३ टक्के परतावा, गुंतवणूकदार लखपती; तुम्ही घेतला का हा स्टॉक?
मी मरण्यासाठी तयार आहे कारण मी.., समंथा प्रभूने व्हिडीओ केला शेअर, चाहतेही झाले थक्क
भाजपची मोठी खेळी! शिवसेनेला झटका देण्यासाठी योगीजी मुंबईत येणार, आता लक्ष्य मुंबई महापालिका