पुणे : गेल्या २८ वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेला कसब्याचा बालेकिल्ला काबीज करून काँग्रेसने महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर भाजपचा पराभव करणे अजिबात अवघड नसल्याचे दाखवून दिले आहे. ज्या वॉर्डात भाजपचे 3-3 नगरसेवक आहेत, तेथे काँग्रेसलाही मते मिळाली आहेत.
भाजपची चांगली मते असलेल्या पेठांनाही धक्का बसला. एकंदरीत माविआने पूर्ण ताकदीनिशी एकवटून मोठ्या कष्टाने भाजपच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावला. कसबा निवडणुकीने माविआला मोठा आत्मविश्वास दिला आहे.
त्यामुळे भाजपचा पराभव करणे अजिबात अवघड नसल्याने आगामी महापालिका व विधानसभा निवडणुकीसाठी माविआने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही तसे संकेत दिले आहेत.
“गेल्या काही वर्षांत भाजपमध्ये प्रवेश करणारे 40 ते 45 नेते आधी काँग्रेस राष्ट्रवादीचेच होते. येत्या काही वर्षांत काही आमदार त्यांच्या पक्षनेतृत्वाला सांगून पुन्हा मुळ पक्षात प्रवेश करू शकतात. असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगीतले.
शेवटी चुका माणसाकडूनच होतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा, त्यांची स्वताची अधिकाराची काही मते आणि पक्षाची काही मते अशा समीकरणावर त्यावेळी संबंधित नेत्यांना निवडून येणे सोपे झाले. शेवटी कोणत्याही आमदाराला मतदारसंघाचा विकास करायचा असतो.
एखाद्या विचारसरणीला विरोध करून पूर्वीप्रमाणे पक्षात रहावे अशी लोकांची मानसिकता आता राहिलेली नाही, हे वास्तव आहे. त्यांना लोकांना काम दाखवायचे आहे. त्यामुळे भाजपचे अनेक आमदारांच्या घरवापसीचे संकेत अजित पवार यांनी दिले होते. नजीकच्या काळात झालेल्या चुका संबंधितांना सुधारता येतील, असे त्यांनी सांगतीतले
अजित पवार म्हणाले, “आमचे काही नेते 2014 मध्ये आम्हाला सोडून गेले, तर काहींनी 2019 मध्ये बाजू बदलली. 2014 मध्ये भारतीय जनता पक्षाने नरेंद्र मोदींच्या करिष्म्याने भारतभर अशी प्रतिमा निर्माण केली आणि एक भ्रम निर्माण केला की सत्तेवर आल्यावर आमूलाग्र बदल होतील.
कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत लोकांनी त्यांना मतदान करून स्पष्ट बहुमत मिळवून दिले. राजीव गांधींनंतर देशात कुणालाही एवढे बहुमत मिळाले नाही. त्यामुळे ज्यांना राजकारण करायचे आहे, पण आपला मतदारसंघ सुरक्षित ठेवायचा आहे, आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा आहे, ते अशावेळी भाजपमध्ये सामील झाले होते.
“पण आता बदललेल्या परिस्थितीत जे तिथे गेले आहेत ते मूळ पक्षात परत येतील. ते ४० ते ४५ आमदार काँग्रेस राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना सांगू शकतात की आमच्याकडून चूक झाली. शेवटी चुका माणसांकडून होतात. तालुका-जिल्ह्याच्या विकासासाठी लोकांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला.
लोक पूर्वीप्रमाणेच पक्षाच्या विचारसरणीला चिकटून राहिले नाहीत. असे म्हणत अजित पवार यांनी आगामी काळात मोठ्या राजकीय उलथापालथीचे संकेत दिले आहेत. राजकारणात उद्याचा शत्रू आजचा मित्र आणि आजचा मित्र उद्याचा शत्रू असतो असेही ते म्हणाले.