Share

४५ कोटी रोकड, ७ किलो सोने; अर्पिताच्या घरी सापडला २ हजार व पाचशेच्या नोटांचा ‘डोंगर’

पश्चिम बंगाल येथील शिक्षक भरती घोटाळ्यासंदर्भात आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. शिक्षक घोटाळा प्रकरणात आरोपी असलेले पार्थ चॅटर्जी यांची निकटवर्तीय अर्पिता मुखर्जी हीच्या दुसऱ्या घरावर ईडीने छापा टाकला आहे. तिच्या घरातून निघालेली रोकड पाहून अधिकारी देखील चक्रावले.

अर्पिता मुखर्जी हीच्या दुसऱ्या घरावर ईडीनं धाड टाकली. यामध्ये तिच्या घरातून तब्बल २८.९० कोटी रुपयांची रोकड आणि पाच किलो सोनं आढळून आलं आहे. तसेच काही महत्वाची कागदपत्रेही ईडीच्या हाती आली आहेत. त्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे.

यापूर्वी अर्पिता मुखर्जीच्या पहिल्या फ्लॅटमधून ईडीच्या अधिकाऱ्यांनी २१ कोटी रुपये जप्त केले होते, आणि आता तिच्या दुसऱ्या घरातून जप्त केलेली रोकड इतकी मोठी होती की, ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्याची मोजदाद करण्यासाठी तब्बल १० तास लागले.

ही मोठी रक्कम तिच्या फ्लॅटच्या टॉयलेटमध्ये लपवण्यात आली होती. विशेष म्हणजे ही रक्कम आणि इतर वस्तू नेण्यासाठी ईडीला चक्क मोठा ट्रक मागवावा लागला. ही जप्त रक्कम शिक्षक भरती घोटाळ्यातील गुन्ह्याच्या कामांसाठी वापरल्याचा ईडीला संशय आहे.

अर्पिता मुखर्जीच्या घरावरील पहिल्या छाप्यात ईडीनं २१.९० कोटी रुपयांची रोख रक्कम तसेच ५६ लाखांचं परदेशी चलन आणि ७६ लाखांचं सोनं असं एकूण २३.२२ कोटी रुपयांचा ऐवज जप्त केला होता. त्यानंतर बुधवारी तपास एजन्सीनं २० कोटी रुपयांची रोख रक्कम आणि २ कोटी रुपयांची सोन्याची बिस्कीटं जप्त केली.

या रक्कमेची ईडीचे अधिकारी अद्यापही मोजदाद करत आहेत. दोन्ही छाप्यांमध्ये मिळून अर्पिता मुखर्जीच्या घरांमधून ४५.२२ कोटी रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अर्पिता मुखर्जीचं म्हणणं आहे की, माझ्या काही कंपन्यांसंदर्भातील ही संपत्ती आहे. मात्र, अधिक चौकशी केल्यानंतर तिने गुन्हा कबूल केला.

इतर क्राईम

Join WhatsApp

Join Now