Share

इंस्टाग्रामवर ‘थेरगाव क्वीन’च्या 40 पेक्षा जास्त अकाऊंट; असा झाला खुलासा, पोलिसही चक्रावले

thergaon-queen

सध्या सोशल मीडियावर थेरगाव क्वीन चांगलीच चर्चेत आहे. थेरगाव क्वीन असे इंस्टाग्रामवर अकाऊंट असलेल्या तरुणीचे खरे नाव साक्षी महाले असे आहे. तिने इंस्टाग्रामवर रिल्स बनवून लोकांना शिवीगाळ आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या.

अश्लील आणि शिवीगाळ केलेल्या व्हिडिओमुळे साक्षी चांगलीच प्रसिद्ध झाली होती. पण अशा व्हिडिओंमुळे लोकांनी तिच्या विरोधात पोलिसांनी तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी या थेरगाव क्वीनला चांगलीच अद्दल घडवली आहे. तसेच तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

त्यानंतर पोलिसांनी या तरुणीला समज देऊन सोडून दिले होते. तसेच तिचा मित्र कुणाल कांबळे नावाच्या युवकाने पोलिसांसमोर माफी मागितली होती. तोही तिच्यासोबत शिवीगाळ करत व्हिडिओ बनवत होता. त्यामुळे पोलिसांनी त्यालाही धडा शिकवत, माफी मागायला लावली. त्यानंतर त्यालाही सोडून देण्यात आले.

मात्र जेलची हवा खावून देखील ‘थेरगाव क्वीन’ची मस्ती अजून उतरलेली दिसत नाहीये. वाकड पोलिसांनी संबंधित मुलीला 30 जानेवारी रोजी अटक केली होती. तरुणी पोलिसांच्या ताब्यातून सुटताच तिनं आणखी एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. तेव्हाचा व्हिडीओ तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊण्टवर पोस्ट केला आहे.

दरम्यान, पोलिसांनी ‘थेरगाव क्वीन’ असलेल्या संबंधित तरुणीकडे याबाबत चौकशी केली. व्हिडिओ व्हायरल करण्यात आलेले इंस्टाग्रामवरील अकाउंट संबंधित तरुणीचे नसून त्या पद्धतीचे 40 पेक्षा जास्त अकाउंट असल्याचे समोर आले आहे.

याबाबत बोलताना वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीक म्हणाले, ‘अश्या प्रकारच्या बनावट अकाऊंटवरती पोलिसांची नजर असून कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह पोस्ट आढळ्यास सायबर गुन्ह्यांतंर्गत कारवाई केली जाणार आहे.’ आता हे सर्व अकाउंट कोणाचे आहेत, ते अकाउंट कोण ऑपरेट करीत आहेत, याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

महत्त्वाच्या बातम्या
दाट धुक्यांमुळे गाडीचा भीषण अपघात, नांदेडमधील त्यागी महाराजांसह शिष्याचा जागीच मृत्यू
टाटा नॅनोची इलेक्ट्रिक कार होणार लाँच, सिंगल चार्जमध्ये चालणार १६० किलोमीटर; किंमत फक्त…
“मी तुम्हाला आव्हान देतो राऊतसाहेब, २०२२ च्या महानगरपालिका निवडणुकीत तुमची चाणक्यनीती दाखवून द्या”
भाजप खासदाराच्या वक्तव्याने वादाला फुटले तोंड; म्हणाले, अंबानी-अदानींची पुजा केली पाहिजे कारण..

इतर क्राईम राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now