मुंबई | सध्या सगळीकडे ‘द काश्मीर फाइल्स’ याच चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. ११ मार्चला प्रभासच्या ‘राधे श्याम’ चित्रपटाबरोबरच दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीचा ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपटदेखील प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रदर्शित होताच सर्वच स्तरातून विवेक अग्निहोत्रीवर कौतुकांचा वर्षाव होतांना दिसत आहे.
विवेक अग्निहोत्रीच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटामध्ये काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराचे चित्रण करण्यात आले आहे. या चित्रपटासाठी दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी कठीण परिश्रम केले आहे. हा चित्रपट प्रदर्शित होताच इतकी चर्चा झाली कि प्रेक्षकांना हा चित्रपट सिनेमागृहात खेचून आणत आहे.
कोणत्याही हिट चित्रपटाची चर्चा हि त्यातील मोठ- मोठ्या कलाकारामुळे किंवा त्यातील गाण्यांमुळे चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच सुरू होते. मात्र ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाबाबतची सर्वाधिक चर्चा हि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीमुळे होत आहे. तसेच या चित्रपटात दिग्गज अभिनेते अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती आणि दर्शन कुमार यांच्यासारख्या अभिनेत्यांचा देखील समावेश आहे.
या चित्रपटाच्या संपूर्ण प्रमोशनची जबाबदारी विवेक अग्निहोत्री यांनी स्वत:च्या खांद्यावर घेतली होती. तसेच हा चित्रपट कसा तयार झाला, किती वर्षांची मेहनत हा चित्रपट बनवतांना लागली, हा सर्व प्रवास त्यांनी सांगितला. ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट बनविण्यासाठी विवेक अग्निहोत्री यांनी पत्नी पल्लवी जोशीसोबत पीडित काश्मिरी पंडितांना भेटण्यासाठी जगभरातील अनेक देश आणि भारतातील अनेक शहरांमध्ये प्रवास केला.
तब्बल ५ हजार तासांचा रिसर्च केला गेला. १५ हजार पानांचे डॉक्युमेंट एकत्र करण्यात आले. एवढेच नाही तर ७०० हून अधिक पीडित काश्मिरी पंडितांच्या मुलाखती रेकॉर्ड केल्याचे विवेक अग्निहोत्री यांनी सांगितले. यासाठी तब्बल ४ वर्षांचा कालावधी लागला.
जवळपास दीड तास चाललेल्या पत्रकार परिषदेत विवेक अग्निहोत्री यांनी एक २० मिनिटांचा व्हिडिओ देखील दाखवला. या व्हिडीओमध्ये त्यावेळी काश्मीरमध्ये उपस्थित असलेल्या काश्मिरी पंडितांच्या मुलाखती होत्या. २० मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये विवेक आणि पल्लवी जोशी विविध ठिकाणी पीडितांशी बोलताना त्यांचे अश्रू पुसताना दिसत आहेत.
या मुलाखतीत काश्मिरी पंडितांची व्यथा रेकॉर्ड करण्यात आली. काश्मिरी पंडितांना त्यांच्या घरातून हाकलण्यात आले होते. पण त्यावेळच्या राजकीय व्यवस्थेने काश्मिरी पंडितांवर नेमके किती अत्याचार केले, हे कळू दिले नाही. सरकारने ही शोकांतिका लपविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, असेही विवेक अग्नीहोत्री म्हणतात.
दरम्यान, या चित्रपटाच्या संपूर्ण प्रमोशनची जबाबदारी विवेक अग्निहोत्री यांनी स्वत:च्या खांद्यावर घेतली होती. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या तिसऱ्याच दिवशी दिग्दर्शकाने दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यामागचे कारण असे कि, हा चित्रपट बनवण्यामागे घेण्यात आलेले कष्ट आणि रिसर्चची संपूर्ण माहिती सर्वांसमोर येणे गरजेचे आहे असेही अग्निहोत्री यावेळी बोलतांना म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
मोठी संधी! ‘या’ दोन शेअर्समध्ये करा गुंतवणूक, दोन आठवड्यात होईल मोठी कमाई, तज्ञांचा सल्ला
भन्नाट ऑफर! अवघ्या ३ लाखांत मिळतेय एर्टीगा कार; होळीपुर्वी मारुतीने जाहीर केला मेगासेल
नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’ चित्रपटामुळे कपिल शर्मा पुन्हा एकदा चर्चेत, प्रेक्षकांकडून बहिष्काराची मागणी
‘द काश्मीर फाइल्स’ चे कौतुक करताना कंगनाने बॉलीवूडला फटकारले; म्हणाली, आता सगळे शांत का?