4 year old girl gondia | लहान मुलं खेळत असताना कधी काय करतील हे सांगता येत नाही. त्यामुळे खेळता खेळता ते असे काही करतात, ज्यामुळे घरच्यांनाही टेंशन येतं. पण आता गोंदियामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका चार महिन्याच्या लहान मुलीच्या अन्ननलिकेत चक्क ६ दगड अडकल्याची घटना समोर आली आहे.
गोंदियातील सालेकसा तालुक्यातील येत असलेल्या लटोरी गावात ही घटना समोर आली आहे. जेव्हा त्या मुलीचा एक्सरे काढण्यात आला तेव्हा कुटुंबात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर गोंदियातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये त्या मुलीवर ऑपरेशन करुन ते ६ दगड काढण्यात आले आहे.
डॉ. विकास जैन यांनी त्या मुलीवर उपचार केले आहे, सध्या त्या मुलीची प्रकृती ठिक आहे. चार महिन्याची असलेल्या या मुलीला खुप खोकला येत होता. त्यामुळे पालकांनी तिला खेकड्याचा ज्युस प्यायला दिला होता. पण तरीही तिचा खोकला थांबायचं नाव घेत नव्हता.
मुलगी सतत रडत होती. त्यामुळे पालकांनी तिला गोंदियाच्या एका डॉक्टरांकडे दाखवले. त्यानंतर डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केले पण फरक पडत नव्हता. त्यानंतर डॉक्टरांनी तिचे एक्सरे काढले. त्यामध्ये मुलीच्या अन्ननलिकेत काहीतरी अडकल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले.
त्यानंतर मुलीचे सिटीस्कॅन करण्यात आले. त्यामध्ये मुलीच्या अन्ननलिकेत दगड अडकल्याचे लक्षात आले. डॉ. विकास जैन यांनी हे ६ दगड काढले आहे. आता मुलीची प्रकृती चांगली आहे. पालक गरीब कुटुंबातील असल्यामुळे डॉक्टरांनी मुलीच्या ऑपरेशनचे पैसेही घेतले नाही.
या ऑपरेशननंतर पालकांना फक्त औषधांचा खर्च करावा लागला आहे. लाखो रुपयांचे ऑपरेशन मोफत केल्यामुळे डॉक्टरांचे कौतूक केले जात आहे. पण इतक्या लहान मुलीच्या अन्ननलिकेत ६ दगड गेले कसे? यामागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. सध्या ती मुलगी परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.
महत्वाच्या बातम्या-
Uttar Pradesh : माहेरच्यांनी हुंड्यात दिली म्हैस, महिलेने शक्कल लढवून थाटला व्यवसाय, अनेकांना दिला रोजगार
Jayant Patil : राष्ट्रवादीचे जयंत पाटील भाजपच्या वाटेवर? भाजप नेत्याच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ; म्हणाले, त्यांच्या घरावर…
Uddhav Thackeray : बीडमध्ये खळबळ! एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमाला जाणे भोवले, शिवसेनेतून ‘या’ बड्या नेत्याची हकालपट्टी