अभिनेता यशच्या ‘केजीएफ २’ (KGF 2) या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट धुमाकूळ घालत आहे. तसेच चित्रपटासंबंधित छोटी-मोठी गोष्टसुद्धा सध्या वेगाने व्हायरल होत आहे. यादरम्यान गुजरातमधील वडोदरा येथे या चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान काही अज्ञात लोकांनी सिनेमागृहातील ३ डी स्क्रिन तोडून तिकीट तपासनीसला मारहाण केल्याचे वृत्त समोर येत आहे.
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, सिनेमागृहाचे कॅशिअर निमेश कडकिया यांनी यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. निमेश यांच्या तक्रारीनुसार १५ एप्रिल रोजी ४ व्यक्ती ‘केजीएफ २’ चित्रपट पाहण्यासाठी आले होते. त्यानुसार त्यांनी तिकीट खरेदी करून सिनेमागृहात पोहोचले. परंतु, सिनेमागृहात गेल्यानंतर या ४ व्यक्तींनी त्यांना दिलेल्या जागेवर न बसता इतर जागेवर बसले.
त्यानंतर सिनेमागृहात तिकीट तपासणीसाठी आलेल्या दोन तिकीट तपासनीसांनी त्या चार व्यक्तींना त्यांच्या जागेवर जाऊन बसण्यास सांगितले. परंतु, तिकिट तपासनीसांचे ऐकून न घेता त्या लोकांनी तपासनीसलाच मारहाण केली. तसेच सिनेमागृहातही त्यांनी तोडफोड केली. रिपोर्टनुसार चौघांनी मिळून सिनेमागृहातील ३डी स्क्रीन तोडली असून सिनेमागृहाच्या बाहेरच्या दरवाजाचेही नुकसान केले.
यासंदर्भात निमेश कडकिया यांनी आपल्या तक्रारीत म्हटले की, ‘चारही आरोपींनी दोन तिकीट तपासनीसना मारहाण केली असून सिनेमागृहातील १७ फूट ३ डी स्क्रीन तोडली. या ३ डी स्क्रीनची किंमत ३ लाख ५० हजार रूपये होती. तसेच त्यांनी सिनेमागृहाच्या मुख्य दरवाजाचेही नुकसान केले असून त्याची किंमत ५० हजार रूपये आहे’.
दरम्यान, प्रशांत नील यांच्या दिग्दर्शनात तयार झालेला ‘केजीएफ २’ हा चित्रपट २०१८ साली आलेल्या ‘केजीएफ’ या चित्रपटाचा दुसरा भाग आहे. पहिल्या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई केली होती. तर पहिल्या भागाला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर प्रशांत नील या चित्रपटाचा दुसरा भाग घेऊन आले. तर ‘केजीएफ’चा दुसरा भागही सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
‘केजीएफ २’ हा चित्रपट १४ एप्रिल रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने देशभरात १३४.५ कोटींची कमाई केली आहे. तर केवळ ४ दिवसात या चित्रपटाने ५०० कोटींचा आकडा पार केला आहे. येत्या काळात हा चित्रपट आणखी जुने रेकॉर्ड तोडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या चित्रपटात यशसोबत संजय दत्त, रवीना टंडन, प्रकाश राज यासारखे कलाकारही मुख्य भूमिकेत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
आलिया-रणबीरच्या मेहंदीच्या वेळी करण जोहरसोबत घडला होता मजेशीर प्रकार, वाचून पोट धरून हसाल
मौनी रॉय आणि सूरज नांबियारच्या नात्यात दुरावा? ‘त्या’ एका पोस्टमुळे चर्चांना उधाण
‘मन उडू उडू झालं’ फेम ह्रता दुर्गुळेच्या लग्नाची तारीख आली समोर; ‘या’ दिवशी दिग्दर्शकासोबत बांधणार लग्नगाठ