Share

अनाथ मुलांसाठी दान केली ४ कोटींची संपत्ती; ते कमी पडल्यावर पुन्हा दिले लाखो रूपये

ज्या समाजाने आपल्याला मोठे केले. त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो. हा दातृत्वभाव आजकाल फार कमी होत चालला आहे. दानशूर वृत्तीचे मोठे उदाहरण कोल्हापुरात पाहायला मिळाले. प्रसिद्ध नामांकित वकील अभय नेवगी यांनी एका संस्थेला भलीमोठी रक्कम देणगी म्हणून दिली आहे. (4 Crore wealth donated to orphans; Lakhs of rupees were given again when it fell short)

कोल्हापूरच्या बालकल्याण संस्थेला संकुल बांधण्याकरिता रक्कम कमी पडत असल्याचे समजताच नेवगी यांनी सुमारे ५० लाख रुपयाची रक्कम संस्थेला देण्याचा निर्णय घेतला. बालकल्याण संस्था अनाथ मुलांनी महिलांसाठी काम करणारी संस्था आहे.

ॲडव्होकेट नेवगी हे सर्वोच्च व उच्च न्यायालयात वकिली करतात. कॉम्रेड पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येच्या खटल्यात त्यांच्या कुटुंबीयांची बाजू न्यायालयात ॲड. नेवगी मांडत आहेत.

नेवगी यांनी आपल्या आईच्या आठवणीत ही रक्कम समाजाला दान करण्याचा विचार त्यांनी केला. त्यांचे फार पूर्वी पासूनच बालकल्याण या संस्थेची ऋणानुबंध आहेत. बालकल्याण संस्थेमध्ये अनाथ मुलं आणि अनाथ स्त्रिया यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु त्याला जागा कमी पडत होती.

सरकारने संस्थेला १० गुंठे जमीन दिली. परंतु समाजातील दानशूर लोकांच्या मदतीतून, देणगीतून बांधकामाला सुरुवात झाली. तरी बांधकामाला पैसे कमी पडत असल्याने गती मिळत नव्हती. आता नेवगी यांनी केलेल्या एवढ्या मोठ्या देणगीमुळे संस्थेच्या संकुलाचे काम जोमाने सुरू होण्यास मदत होणार आहे.

ॲडव्होकेट नेवगी यांनी यापूर्वीही कोल्हापुरातील त्यांची मालमत्ता रोटरी मूकबधिर मुलांच्या शाळेस दान केली. बाजारभावात त्या मालमत्तेची किंमत ४ कोटी इतकी होती. समाजात अनेक श्रीमंत लोक पाहायला मिळतात परंतु नेवगी यांच्या दानशूर वृत्तीने समाजासमोर मोठा आदर्श ठेवला आहे.

महत्वाच्या बातम्या-
Uddhav Thackeray: उद्धवला ज्या भावामुळे मिळाली आवडती बायको मिळाली, नंतर त्याचेच उद्ध्वस्त केले करिअर!
Chicken Price: ऐन श्रावणात चिकन ५० टक्क्यांनी स्वस्त, तर अंड्याचे 35 टक्क्यांनी भावही घसरले, वाचा किंमत
शिंदेंचा आता भाजपलाच दणका; भाजपला धडा शिकवणारा ममता, ठाकरे सरकारचा निर्णय रद्द करण्यास नकार

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now