राज्यात गेल्या काही महिन्यांपासून महिला अत्याचाराच्या अनेक धक्कादायक घटना समोर येत आहे. राज्यातही बलात्काराच्या अनेक भयानक घटना घडत आहे. असे असताना आता एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी तब्बल सात लाखांची लाच पोलिसाने घेतली आहे.
अखेर त्या आरोपी पोलिसाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सापळा रचून एका पोलीस अधिकाऱ्याला रंगेहाथ अटक केली आहे. दरम्यान पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेने मात्र परिसरात खळबळ उडाली आहे.
तर जाणून घेऊया नक्की प्रकरण काय… ही घटना मुंबई मधील आहे. भरत मुंढे असं अटक केलेल्या 33 वर्षीय लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे. तो सध्या ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. पोलिसांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, पोलीस ठाण्यात एका तरुणाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यात सहआरोपी न करण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक भरत मुंढे याने या तरुणाकडे ३७ लाखांची मागणी केली. मात्र इतकी मोठी रक्कम आणणार कुठून? असा प्रश्न पडल्याने या तरुणाने मुंढे याला होकार देत त्याच्याविरोधात वरळीतील एसीबीच्या कार्यालयात लेखी तक्रार दाखल केली.
त्यानंतर आरोपी पोलीस उपनिरीक्षक भरत मुंढे याला तरुणाकडून सात लाख रुपये घेताना एसीबीच्या पथकानं रंगेहाथ पकडलं आहे. आणि मुंढे याच्याविरुद्ध एसीबीनं भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम 7 आणि 7अ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच एसीबीचे अधिकारी आरोपीची कसून चौकशी करत आहेत.
दरम्यान, पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाच लाख स्वतःसाठी, दोन लाख वरिष्ठ पोलिस निरीक्षकांसाठी आणि ३० लाख तक्रारदार तरुणीला देण्यात येतील असे मुंढे याने या तरुणाला सांगितले होते. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. सध्या या घटनेने खळबळ उडाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
गिरीश महाजन घेत होते सभागृहात डुलक्या, शेलारांची कोपरखिळी बसताच देऊ लागले घोषणा; पहा व्हिडिओ
मोदींनी अनावरण केलेल्या शिवरायांच्या पुतळ्याचा मेघडंबरीचा भाग तुटला, महापौरांनी दिले स्पष्टीकरण
रणवीर सिंगला अनेकदा कपड्यांशिवाय बघितले आहे ‘या’ अभिनेत्रीने, एकदा तर पॅंटही काढली होती
..तेव्हा पुतिन यांच्या मागे हात बांधून उभे होते मोदी, दोन दशकांनंतर पुन्हा तोच फोटो होतोय व्हायरल






