गाव पातळीवर देखील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना धक्के बसत आहे. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यापासून राजकीय समीकरण वेगाने बदलताना पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारला अन् महाविकास आघाडीला सरकारमधून बाहेर पडावं लागलं.
मात्र तेव्हापासून शिवसेनेला चांगलीच गळती लागल्याच पाहायला मिळत आहे. असं असतानाच उद्धव ठाकरेंना धक्का देणारी आणखी एक बातमी समोर येत आहे. नाशकातील इगतपुरी तालुक्यात शिवसेनेला गळती लागल्याच पाहायला मिळत आहे. यामुळे शिवसेनेच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे.
संघटनात्मक पातळीवर देखील शिवसेनेला खिंडार पडताना पाहायला मिळत आहे. आमदारांपाठोपाठ खासदार अनेक नगरसेवक सरपंच आता शिंदे गटात सामील होताना पाहायला मिळत आहे. शिवसेनेसाठी चिंतेची बाब म्हणजे, नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील 3५ सरपंच युवा सेना पदाधिकारी, शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
यासोबतच इगतपुरी तालुक्यात माजी आमदार पांडुरंग गांगड, माजी सभापती संपत काळे यांनी देखील उद्धव ठाकरेंची साथ सोडली. हा पक्षप्रवेश समारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नाशिकचे खासदार हेमंत गोडसे माजी आमदार काशिनाथ मेंगाळं यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथिगृहावर पार पडला. यामुळे आगामी निवडणुकांना शिवसेना कशी सामोरे जाणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, सत्तांतरानंतर म्हणजेच एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यापासून शिवसेनेला असे धक्के बसत आहेत. पक्षाला बसत असलेले धक्के पाहून आता उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे हे मैदानात उतारले आहेत. सध्या पिता – पुत्र दोघेही महाराष्ट्र पिंजून काढतं आहेत.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत देखील बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात हे जोमाने कामाला लागले आहेत. मात्र राज्यात सध्या शिंदे – फडणवीस सरकारचीच हवा असल्याच पाहायला मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CM शिंदेंच्या हस्ते सरन्यायाधीशांचा सत्कार झाल्याने वाद; उज्ज्वल निकम म्हणाले, आत्तापर्यंतच्या प्रघातानुसार..
धावत्या कारने महामार्गावर घेतला पेट, भरपावसात गाडीतून CM शिंदे उतरले, म्हणाले, ‘गाडी आपण नवी घेऊ, काळजी करू नकोस’
प्रभादेवीतील वाद चिघळणार? शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकरांविरोधात पोलिसांनी उचललं मोठं पाऊल, वाचा नेमकं काय घडलं?