Share

३३ वर्षीय अभिनेत्याने १५ वर्षीय रेखाचा जबरदस्तीने घेतला होता किस, त्यानंतर १० वर्षांनी…

बॉलीवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक असलेल्या रेखाने (Rekha) १९५८ मध्ये तिच्या करिअरला सुरुवात केली आणि २०१८ पर्यंत मोठ्या पडद्यावर सक्रिय राहिली. रेखाने तिच्या ६० वर्षांच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आणि राष्ट्रीय ते फिल्मफेअर पुरस्कार जिंकले. ‘सिलसिला’पासून ‘खूबसूरत’, ‘खून भरी मांग’, ‘जुबैदा’ आणि ‘लज्जा’ असे अनेक चित्रपट आहेत, जे रेखाच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जातात.

मात्र तुम्हाला माहित आहे का की, रेखाचा असाच एक चित्रपट होता, जो एका किसिंग सीनमुळे १० वर्षे प्रदर्शित होऊ शकला नाही. या किसिंग सीनवरून बराच गदारोळ झाला आणि सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला १० वर्षांनंतर रिलीज करण्याची परवानगी दिली. याबद्दल बोलण्यापूर्वी आपण रेखाच्या फिल्मी करिअरची सुरुवात आणि तिचे बैकग्राउंड जाणून घेऊया. रेखाचे नाव भानुरेखा गणेशन होते. तिचे वडील जैमिनी गणेशन आणि आई पुष्पवल्ली हे दक्षिण चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठे स्टार होते.

रेखाला अभिनयाचे गुण वारशाने मिळाले होते, पण वडिलांनी रेखाला कधीच स्वीकारलं नाही. जैमिनी गणेशन हे त्यांची पत्नी पुष्पवल्ली आणि मुलगी रेखा यांची भेट कधीतरीच घेत असे. काही वर्षांनी रेखाच्या आईचे निधन झाले. त्या अपघातानंतर काही वर्षांनी रेखा आणि तिचे वडील जैमिनी गणेशन यांच्यातील संबंध सुधारू लागले. रेखाने १ वर्षाची असतानाच तेलगू चित्रपटातून पदार्पण केले. रेखाचा अभिनय आणि त्यासोबतच तिचा अभ्यासही सुरूच होता.

रेखा तिची आई पुष्पवल्ली यांच्या सांगण्यावरून चित्रपटांमध्ये काम करत राहिली. रेखाने एका मुलाखतीत याबद्दल सांगितले होते. मुलीने चित्रपटात काम केले तर चार पैसे मिळतील, आर्थिक संकटातून बाहेर पडण्यास मदत होईल, असे आईला वाटत असे. अशा रीतीने येणाऱ्या काळात रेखाने शाळा आणि अभ्यास सोडून पूर्णपणे चित्रपटात प्रवेश केला. मात्र १९७० मध्ये आलेल्या ‘दो शिकारी’ या चित्रपटाने तिला आयुष्यभराचा ‘डाग’ दिला.

या चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि अभिनेत्याने निष्पाप रेखासोबत असे कृत्य केले होते, ज्याचा परिणाम अभिनेत्रीच्या प्रतिमेवर आणि तिच्या चित्रपट कारकिर्दीवर झाला. ‘दो शिकारी’चे नाव आधी ‘अंजना सफर’ होते. या चित्रपटाचा नायक विश्वजित चॅटर्जी होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजा नवाथे यांनी केले होते. १९६९ मध्ये या चित्रपटाची निर्मिती सुरू झाली, पण रेखा आणि विश्वजित यांच्यातील किसिंग सीनने संपूर्ण खेळच बिघडवला.

किसिंग सीनमुळे झालेल्या वादामुळे तो चित्रपट १० वर्षांनी म्हणजे १९७९ मध्ये रिलीज झाला. यासिर उस्मानने त्याच्या ‘रेखा: द अनटोल्ड स्टोरी’ या पुस्तकात ‘दो शिकारी’च्या या किसिंग सीनबद्दल आणि त्यावरून झालेल्या वादाविषयी सांगितले होते. त्या घटनेबद्दल पुस्तकात लिहिले आहे की, ‘त्या दिवशी रेखा आणि विश्वजित यांच्यात एक रोमँटिक सीनचे चित्रीकरण होणार होते.

rekha biswajeet movie stalled by censor

शूटिंगपूर्वी सर्व रणनीती आखली होती, कॅमेरेही तयार होते. दिग्दर्शकाने ‘अॅक्शन’ बोलताच, विश्वजितने रेखाला त्याच्या मिठीत घेऊन किस करायला सुरुवात केली. या किसबाबत रेखाला काहीही सांगण्यात आले नव्हते. कॅमेरा फिरत राहिला. ना दिग्दर्शकाने ‘कट’ म्हटले ना विश्वजितने रेखाला किस करणे थांबवले. सुमारे ५ मिनिटे विश्वजित चॅटर्जी रेखाला किस करत राहिला आणि क्रू मेंबर्स शिट्ट्या आणि टाळ्या वाजवत राहिले. रेखा रडत होती पण तिने डोळे घट्ट मिटले होते.

दिग्दर्शक रेखाला या किसिंग सीनबद्दल पटवण्याआधीच ते सर्वत्र आगीसारखे पसरले. एका मासिकाने रेखा आणि विश्वजित चॅटर्जी यांच्या किसिंग सीनचे फोटो आणि त्याची संपूर्ण कथा प्रकाशित केली होती. रेखाबद्दल सर्वत्र चर्चा सुरू झाल्या. असे म्हटले जात होते की एका साउथ इंडियन ब्यूटीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे, जिला ‘बोल्ड’ होण्यास अजिबात संकोच नाही.

या किसिंग सीनवर रेखा नाराज होत असतानाच सेन्सॉर बोर्डानेही त्यावर आक्षेप घेतला. चित्रपटातून किसिंग सीन हटवण्याऐवजी सेन्सॉर बोर्डाने त्याचे प्रदर्शन थांबवले. वास्तविक, रेखाने जेव्हा हा चित्रपट आणि किसिंग सीन केले तेव्हा ती १५ वर्षांची होती. पडद्यावर एका अल्पवयीन व्यक्तीसोबत किसिंग सीन दाखवल्याप्रकरणी सेन्सॉर बोर्डाने त्याच्या रिलीजवर बंदी घातली होती. रेखा आणि विश्वजित यांचा हा चित्रपट १० वर्षे सेन्सॉरच्या जाळ्यात अडकला आणि नंतर १९७० मध्ये रिलीज झाला.

महत्वाच्या बातम्या-
ब्रेकअपनंतर जेव्हा रेखा पार्टीत भेटली, तेव्हा सर्वात आधी अमिताने केलं होतं हे काम. चाहतेही हैराण
या अभिनेत्रीला स्वत:पेक्षा हुशार आणि सुंदर समजते रेखा, म्हणाली, तिने सगळ्यांना वेड लावले होते
भाभीजी घर पर हैं मध्ये 300 हून अधिक व्यक्तिरेखा साकारणाऱ्या आसिफने केला वर्ल्ड रेकॉर्ड, वाचून अवाक व्हाल
रेखाला सेक्स-मॅड समजायची तिची सासू, या अभिनेत्यासोबत लग्न केल्यानंतर सहन केला आतोनात त्रास

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now