महाराष्ट्र पुन्हा एकदा हदरला आहे. आई – लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना घडली होती. ती घटना ताजी असतानाच महाराष्ट्रात पुन्हा एकदा खळबळजनक घटना घडली आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा शोध घेत आहे.
आईनंच 30 हजारांची सुपारी देऊन केली मुलीची हत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सध्या आईवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आईला अटक करण्यात आली आहे. तसेच पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. तर जाणून घेऊयात नेमकं प्रकरण काय.
ही घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडल्याचे उघडकीस आले आहे. सैदा बदावत (वय, 30) असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. सैदा ही तेलंगणाच्या विजयवाडा जिल्ह्यातील कोंडापल्ली येथील रहिवासी आहे. सैदाच्या चारित्र्याबाबत तिच्या आईला शंका आली आणि याच कारणावरून आईने नातेवाईकांना मुलीची सुपारी दिली.
अनेक वर्षांपूर्वी ती नवऱ्यापासून विभक्त झाली होती. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या महितीनुसार, गर्भपात करण्याच्या बहाण्यानं सैदाच्या आईने तिला राजुरा तालुक्यातील मुंडीगेट येथील नातेवाईकाकडं पाठवलं. तसेच त्यानंतर नातेवाईकांनी तिला विहिरीत ढकलून तिची हत्या केली.
सध्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. त्यानंतर 18 फेब्रुवारीला एका अज्ञात महिलेचा राजुरा तालुक्यातील कविटपेठ येथे विहिरीत मृतदेह आढळला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा शोध सुरू केला. तसापादरम्यान मिळालेल्या माहितीने पोलिसांनाही जबर धक्का बसला.
सौदाच्या आईनंच चारित्र्याच्या संशयावरून आपल्या मुलीची सुपारी देऊन हत्या केल्याची पोलिसांनी माहिती दिली. या प्रकरणी आईला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तसेच पोलिस पुढील तपास करत आहेत. मात्र या घटनेने पुन्हा एकदा आई – लेकीच्या नात्याला काळिमा फासली आहे. सध्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
‘युद्ध नको बुद्ध हवा’, प्रख्यात लेखकाची फेसबुक पोस्ट चर्चेत, लोकांना दिला मोलाचा संदेश
“मलिकांना अटक झाल्यावर थयथयाट करणारे एसटीचा संप मिटवण्यासाठी काहीच का करत नाहीत?”
शाळेत मोबाईल वापरताना शिक्षिकेने पकडले, विद्यार्थ्यांना दिली भयंकर शिक्षा, व्हिडीओ पाहून अवाक व्हाल
मित्रांनी आधी दारू पाजली मग.., खेड घाटात झालेल्या तरुणाच्या हत्येचे गूढ उकलले, वाचून धक्का बसेल