Share

eknath shinde : आणखी एक 3 लाख कोटींचा प्रकल्प राज्याबाहेर जाणार? शिंदे – फडणवीसांनी घेतली तातडीची बैठक

Devendra Fadanvis Eknath Shinde

eknath shinde : गेल्या काही दिवसांपूर्वी वेदांत प्रकल्पावरून राज्यातलं राजकारण चांगलच तापलं होतं. शिंदे – फडणवीस सरकार सरकार सत्तेत येताच वेदांत प्रकल्पावरून नवीन वादाला तोंड फुटले होते. विरोधकांनी याच मुद्याचा आधार घेत राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला होता.

‘वेदांत-फॉक्सकॉन’ प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने शिंदे – फडणवीस वादाच्या भोवऱ्यात सापडलं होतं. ते प्रकरण नवीन असतानाच आता आणखी एक प्रकल्प राज्याबाहेर जाणार असल्याच बोललं जातं आहे. यामुळे पुन्हा एकदा शिंदे – फडणवीस सरकार अडचणीत येणार असल्याच बोललं जातं आहे.

तीन लाख कोटींचा नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्प आता चर्चेत आला आहे. मिळालेल्या महितीनुसार, तीन लाख कोटींचा नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्प राज्याबाहेर जाऊ नये, यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जातं असल्याच पाहायला मिळत आहे. राज्याच्या राजकारणात सध्या हाच विषय सुरू आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वीच वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्पावरून वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या राज्य सरकारने सुमारे तीन लाख कोटींचा तेलशुद्धीकरण प्रकल्प राज्याबाहेर जाऊ नये, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याबाबत मंत्रिमंडळाची गुरुवारी महत्त्वाची बैठक पार पडली.

मिळालेल्या महितीनुसा, या बैठकीमध्ये नाणार प्रकल्पाबाबत चर्चा झाली असल्याच बोललं जातं आहे. मागच्या सरकारने म्हणजेच महाविकास आघाडी सरकारने नाणार प्रकल्प बारसू येथे उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता शिंदे – फडणवीस सरकारने याबद्दल एक निर्णय घेतला आहे.

नाणार येथे भूसंपादन झाले असल्याने आणि प्रकल्पासाठी हीच जागा सुयोग्य असल्याने तिथे प्रकल्प उभारण्याबाबत बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. यावर आता विरोधक काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहेत. अद्याप यावर कोणत्याच नेत्यांच्या प्रतिक्रिया आलेल्या नाहीये.

महत्वाच्या बातम्या-
Thackeray group : अखेर शिवसैनिकांनी बदला घेतलाच; बंडखोरांना गावागावात घेरलं अन् पाडलं तोंडघशी
Kolhapur : …मग तेव्हा का भाजपने राजकारणाची संस्कृती जपली नाही’; कोल्हापुरची वाघीन कडाडली
Telangana: चेकपोस्टवर भाजप नेत्याच्या कारमध्ये पोलिसांना सापडली नोटांची रास; विचारणा केली असता म्हणाला…

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now