राज्यात भाजपला डावलून शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांनी मिळून महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. राज्यात सत्तांतर झाल्यापासून भाजप – शिवसेनेमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. 25 वर्षे सोबत राहून निवडणुका लढणारे आता एकमेकांच्या विरोधात उभे आहेत.
राज्यात सत्तापालट झाल्यानंतर आता दोनही पक्षातील नेते एकमेकांवर टीकेचे बाण सोडल्याशिवाय राहत नाहीत. तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांचा सपाटा सुरु असल्याचं दिसत आहे. यामध्ये प्रामुख्यानं महाविकास आघाडी सरकारमधील अनेक बडे नेते रडावर आहेत.
अशातच महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांच्या नेत्यांवरही केंद्रीय तपास यंत्रणांची नजर असून राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसमधील अनेक बड्या नेत्यांच्या मागे येत्या काही दिवसांत कारवायांचा सपाटा लागणार असल्याची सूचक वक्तव्य अनेक भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहेत.
मात्र याच दरम्यान राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची राजकीय घडामोड घडली आहे. भाजपा खासदाराने दिल्लीत शिवसेना खासदार संजय राऊतांची तब्बल ३ तास भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. भाजप खासदार वरुण गांधी यांनी संजय राऊत यांची मंगळवारी दिल्लीत भेट घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, राऊत यांनी वरुण गांधी यांना जेवणासाठी आमंत्रित केलं होतं. दरम्यान संजय राऊत आणि वरुण गांधी यांच्या ‘डिनर डिप्लोमसी’मुळे चर्चांना उधाण आलं आहे. मंगळवारी राऊत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी रात्री सुमारे तीन तास दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली.
दरम्यान, चर्चेचा तपशील मात्र अद्याप समजू शकलेला नाही. तर दुसरीकडे सध्या वरूण गांधी भाजपापासून अलिप्त राहत असून विविध मुद्द्यावर ते स्वपक्षाला घेरताना दिसत आहेत. त्यामुळे वरुण गांधी भाजपात नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यातच त्यांनी राऊत यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
मुंबईचा पराभव केल्यावर रिषभ पंत रोहीतला म्हणाला “जा वडापाव खाऊन ये”? वाचा व्हायरल पोस्टमागील सत्य
मराठी सिनेसृष्टीतील ‘या’ जोडप्याने केले गुपचूप लग्न; फोटो झाले व्हायरल
राज्याला आज सर्वात स्वच्छ आणि इमानदार मुख्यमंत्री लाभला; वरुण सरदेसाई यांनी केले तोंड भरून कौतुक
आजची सावित्री! बिबट्याच्या जबड्यातून वाचवला पतीचा जीव; अहमदनगरच्या महिलेचं राज्यभरात होतंय कौतुक