Share

UK : जोडप्याला किचनच्या फरशीखाली सापडला ३०० वर्षांपुर्वीचा खजिना, रात्रीत झाले ‘इतक्या’ कोटींचे मालक

gold coins

264 gold coins in uk  | कधी कोणाला काय सापडेल हे सांगता येत नाही. अनेकदा लोकांना हैराण करणाऱ्या गोष्टी सापड असतात. आता असाच एक प्रकार लंडनमधून समोर आला आहे. लंडनमध्ये एका जोडप्याला त्यांच्याच घरात सुमारे सात कोटी रुपयांची सोन्याची नाणी सापडली.

ही दुर्मिळ नाणी किचनच्या फरशीखाली गाडली गेली. हे जोडपे त्यांच्या घरात दुरुस्तीचे काम करत होते, तेव्हा त्यांना ही नाणी सापडली. ही नाणी नुकतीच एका लिलावात विकली गेली. नॉर्थ यॉर्कशायर, यूके येथे एका घरात जोडप्याला 264 सोन्याची नाणी सापडली.

नाणी एका पातेल्यामध्ये भरलेली होती आणि स्वयंपाकघरातील फरशीपासून ६ इंच खाली होती. एकदा जोडप्याला वाटले की जमिनीच्या आत एक विद्युत तार आहे. पण कपाची नीट तपासणी केली असता त्यात १६१० ते १७२७ या काळातील नाणी आढळून आली आहे.

नाणी मिळाल्यानंतर या जोडप्याने लगेचच लंडनमधील एका लिलाव कंपनीशी संपर्क साधला होता. यानंतर कंपनीतील काही  लोक या जोडप्याच्या घरी आले. त्या लोकांनी जेव्हा नाण्यांबद्दल माहिती दिली तेव्हा जोडप्याला आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांनी सांगितले की ही नाणी ३०० वर्षे जूनी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही नाणी फर्नले-मीस्टर्स या श्रीमंत कुटुंबाची आहेत. जे ३०० वर्षांपूर्वी प्रसिद्ध उद्योगपती होते. या कुटुंबातील सदस्य नंतर राजकारणतही गेले होते. इतकंच नाही तर कुटुंबाचे प्रमुख १७ व्या शतकाच्या सुरुवातीस व्हिग पक्षाचे सुप्रसिद्ध नेते होते.

NBC न्यूयॉर्कच्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, या जोडप्याने अलीकडेच ही नाणी सुमारे ७ कोटी रुपयांना लिलावात विकली. या जोडप्याने आपली ओळख जाहीर केली नाही, परंतु सांगितले की ते 10 वर्षांपासून घरात राहत होते आणि दोन वर्षांपूर्वी त्यांना ही नाणी सापडली होती.

महत्वाच्या बातम्या-
satya manjrekar : लोक म्हणाली याला नाच्याची भूमिका द्या तर भडकला सत्या मांजरेकर; आता जिममध्ये गाळतोय घाम
majhya navryachi bayko : माझ्या नवऱ्याची बायको मालिका पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, अर्जून कपूर साकारणार ‘गॅरी’ची भूमिका
Rahul Gandhi : शेतकरी आत्महत्या करत असताना उद्योगपतींचं हजारो कोटींचं कर्ज कसं माफ होतं? राहूल गांधी भडकले 

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now