Share

२५ दिवसांत डबलचे आमिश दाखवून सोलापूरकरांना तब्बल १२ कोटींना गंडा घातला; फटे स्कॅम वाचून बधिर व्हाल

महाराष्ट्रात सध्या बार्शीच्या फाटे घोटाळ्याची जोरदार चर्चा होत आहे. बार्शीमधल्या प्रत्येक चौकात, दुकानांमध्ये कोणाचे किती पैसे बुडाले हीच चर्चा सुरु आहे. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावावर बार्शी शहरात कोट्यवधींचा घोटाळा करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांकडून आरोपींना अटक करण्यात आली आहे.

‘फाटे घोटाळा’ प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल फटेचे वडील आणि भावाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुख्य आरोपी विशाल फटे याचे वडील अंबादास फटे, भाऊ वैभव फटे यांना पोलिसांनी पकडलं आहे. शुक्रवारी मध्यरात्री सांगोला येथून स्थानिक गुन्हे शाखेने या दोघांना ताब्यात घेतलं आहे. मुख्य आरोपी विशाल फटे अद्यापही फरार आहे.

कोट्यवधीच्या फसवणूक प्रकरणी विशाल फटेसोबत त्याच्या कुटुंबातील ४ सदस्य देखील आरोपी आहेत. त्यापैकी दोघे जण आता पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. आरोपी विशाल फटेचा जवळचा मित्र असलेल्या दीपक आंबरेने या प्रकरणात पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. दीपक आंबरे यांच्यासह अनेक जवळच्या मित्रांना देखील आरोपी विशाल फटेने फसवले आहे.

दीपक आंबेरेच्या फिर्यादीनंतर बार्शी शहर पोलिस ठाण्यात तक्रारींचा पाऊस पडतोय. गुन्हा दाखल होत असताना केवळ ६ लोकांनी यासंदर्भात तक्रार दिली होती. मात्र काल एका दिवसात आणखी ४० लोकांनी आपली फसवणूक झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली आहे. फसवणुकीचा आकडा जवळपास १२ कोटींवर पोहोचल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष पथक पोलिसांकडून नेमण्यात आले आहे.

विशाल फटे हा मुळचा मंगळवेढा तालुक्यातील आहे. त्याचे वडील बार्शीतील एका महाविद्यालयात प्राध्यापक होते. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून ते बार्शीतच वास्तव्यास होते. बार्शीतील शिवाजी महाविद्यालयासमोर साई नेट कॅफे नावाने तो नेट कॅफे चालवत होता. इथूनच तो छोट्या प्रमाणात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक देखील करत होता.

२०१९ साली विशालची ओळखी दीपकसोबत झाली. विशालने दिपकला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. त्याच्याकडून विशालने पहिल्यांदा ७० हजार रुपये घेतले. पहिल्याच महिन्यात ३० हजार रुपये वाढ करुन एक लाख रुपयांचा परतावा विशालने दीपकला दिला. यामुळे त्यांचा विश्वास वाढत गेला.

त्यांनतर जवळपास ५ कोटी रुपयांची गुंतवणूक दिपकने विशालकडे केली होती. मात्र विशाल आपल्या परिवारासह पैसे घेऊन पसार झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल फटे मित्रांना पाब्लो एस्कोबार सारखा श्रीमंत व्हायची स्वप्न दाखवायचा. पाब्लो एस्कोबारचे उदाहरण देऊन विशाल फटेनं बार्शी आणि सोलापुरातील अनेकांना कोट्यवधींचा चुना लावला आहे. त्याच्याविरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या :-
२५ दिवसांत डबलचे आमिश दाखवून सोलापूरकरांना तब्बल १२ कोटींना गंडा घातला; फटे स्कॅम वाचून बधिर व्हाल
“… तर मंत्र्यांना त्याच किल्ल्यावरुन कडेलोट करण्याचीही हिंमत ठाकरे सरकारने दाखवावी”
सावधान! ATMमधून पैसे काढताना हिरव्या लाईटकडे लक्ष द्या, नाहीतर तुमचे बँक खाते होईल रिकामे

 

आर्थिक

Join WhatsApp

Join Now