कोलकात्याच्या न्यू टाऊनमध्ये राहणारी २४ वर्षीय पायलट महाश्वेता चक्रवर्ती सध्या खूप चर्चेत आहे. ऑपरेशन गंगा अंतर्गत, महाश्वेता यांनी युक्रेनमध्ये अडकलेल्या ८०० विद्यार्थ्यांना सुखरूप परत आणले आहे.(24-year-old pilot Mahasweta’s admirable performance)
ऑपरेशन गंगा सदस्य महाश्वेता चक्रवर्ती यांनी २७ फेब्रुवारी ते ७ मार्च दरम्यान ६ हद्दपार उड्डाणे उडवली होती. त्यांनी पोलंड आणि हंगेरी येथून ६ हद्दपार उड्डाणे उडावली होती. महाश्वेता चक्रवर्ती यांनी युक्रेनच्या पोलंड आणि हंगेरीच्या सीमेवर अडकलेल्या ८०० हून अधिक विद्यार्थ्यांची सुटका केली आहे.
महाश्वेता यांनी पोलंडमधून ४ आणि हंगेरीमधून २ हद्दपार उड्डाणे उडावली आहेत. महाश्वेता चक्रवर्ती यांनी त्यांचा अनुभव सांगितला. हा अनुभव सांगताना त्या म्हणाल्या की, ऑपरेशन गंगा अंतर्गत विद्यार्थ्यांना वाचवणे हा त्यांच्यासाठी आयुष्यभराचा अनुभव आहे.
महाश्वेता यांनी सांगितले की, त्यांना रात्री उशिरा फोन आला होता. यादरम्यान त्यांना सांगण्यात आले की, त्यांची ऑपरेशन गंगा सदस्य म्हणून निवड झाली आहे. तुम्हाला युद्धग्रस्त देशात अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुखरूप परत आणायचे आहे.
महाश्वेता चक्रवर्ती ऑक्सिलियम कॉन्व्हेंट स्कूलची विद्यार्थिनी आहे. त्या त्यांच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी आहेत. महाश्वेता यांची आई तनुजा चक्रवर्ती बंगाल भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा आहेत. महाश्वेता या देखील वंदे भारत मिशनचा एक भाग आहेत.
महाश्वेता या ‘ऑपरेशन गंगा’ पूर्वीही मोठ्या आपत्कालीन ऑपरेशनचा एक भाग होत्या. कोविड-१९ दरम्यान संपूर्ण जग लॉकडाऊनमध्ये असताना महाश्वेता वंदे भारत मिशनसाठी काम करत होत्या.
महत्वाच्या बातम्या
मुलगा मुख्यमंत्र्यांना पाडून झाला आमदार, तरीही सफाई कामगार आई पोहोचली कामावर; म्हणाली..
आतंकवाद्यांना पाकच पुरवतो पैसा, त्यांना काळ्या यादीत टाका; अमेरिकन खासदाराने केली पोलखोल