शेअर बाजारात(Shear Market) सध्या प्रचंड उलथापालथीचे वातावरण आहे. या वातावरणातही, वस्त्रोद्योग क्षेत्रातील एक स्टॉक असा आहे की, जो जबरदस्त कामगिरी करत आहे. हा स्टॉक शेअरधारकांना मोठा परतावा देत आहे. शेअर बाजारातील घसरणीनंतरही हा शेअर गेल्या ५ सत्रांमध्ये सातत्याने बाजारात वर जात आहे. आज हा शेअर ४.९९ टक्क्यांनी वधारून ९३.५५ रुपयांपर्यंत पोहचला आहे. या स्टॉकचे नाव आहे – AK Spintex(24-rupees-stock-make-investor-millioner)
२४ डिसेंबर २०२१ रोजी शेअर बाजारात या टेक्सटाईल स्टॉकची किंमत २४.९ रुपये होती. आज २५ जानेवारी २०२२ रोजी हा स्टॉक रु ९३.५५ वर पोहोचला आहे. एका महिन्याच्या काळात या स्टॉकने केवळ २३ ट्रेडिंग सत्रांमध्ये २७५.७% चा जबरदस्त परतावा देऊन आपल्या गुंतवणूकदारांना आश्चर्यचकित केले आहे.
जर एखाद्या गुंतवणूकदाराने या पेनी स्टॉकमध्ये २४ डिसेंबर २०२१ रोजी एक लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्या एक लाख रुपयांचे ३.७५ लाख रुपये झाले असते. जानेवारी महिन्यात या शेअरच्या किंमतीमध्ये प्रत्येक शेअरमागे ६० रुपयांची वाढ झाली आहे. 3 जानेवारीला AK Spintex च्या शेअरची किंमत ३३.५० रुपये होती. ती किंमत २५ जानेवारीला ९३.५५ रुपये झाली आहे.
केवळ १७ दिवसांमध्ये या समभागाने आपल्या गुंतवणूकदारांना १७९.२५ टक्के इतका चांगला परतावा दिला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने २०२२ च्या पहिल्या आठवड्यात या स्टॉकमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते, तर आज ही रक्कम २.७९ लाख रुपये झाली असती. गेल्या ५ ट्रेडिंग सत्रांमध्ये हा स्टॉक २१ टक्क्यांहून अधिक वाढला आहे. गेल्या आठवड्यात बुधवारी या समभागाची किंमत ७७.०५ रुपये होती.
ही कंपनी मूळत: “AK Processors Pvt Ltd” या नावाने ओळखली जाते. या कंपनीची सुरुवात ६ ऑक्टोबर १९९४ रोजी झाली आहे. मानवनिर्मित कापडांवर प्रक्रिया करण्याच्या उद्देशाने या कंपनीची सुरुवात करण्यात आली होती. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी आणि भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी या कंपनीचे ६ जानेवारी १९९५ मध्ये पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये रूपांतर करण्यात आले.
ऐंशीच्या दशकात वस्त्रोद्योग क्षेत्रात भरपूर संधी होत्या. वस्त्रोद्योग विकासावर सरकारने भर दिला. या संधीचा फायदा घेण्यासाठी कंपनीने कापड प्रक्रिया व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. सध्या शेअर बाजारात पडझड सुरु आहे. गुंतवणूकदारांना मोठ्या नुकसानाला सामोरं जावं लागत आहे. या काळात हा स्टॉक गुंतवणूकदारांना आकर्षित करत आहे.
महत्वाच्या बातम्या :-
रवी शास्त्री यांचा खळबळजनक दावा; ‘आणखी 2 वर्ष कसोटी कर्णधारपदावर राहिला असता, पण…’
सलमानचा फार्म हाऊस गुन्हेगारीचा अड्डा? लहान मुलांची तस्करी, कलाकारांचे मृतदेह; सलमानवर गंभीर आरोप
बर्थडे सेलिब्रेट करायला गेले, पण वाटेतच होत्याचं नव्हतं झालं! वाचा वर्ध्यातील अपघाताचा थरारक घटनाक्रम