Share

Mumbai: मुंबईत बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने २२७ दवाखाने सुरु करणार, रुग्णांना मिळणार मोफत उपचार

eknath shinde

मुंबई (Mumbai): महाराष्ट्रात राजकारणातील अनेक घडामोडीनंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यापासून अनेक घोषणा केल्या. जन्माष्टमीनिमित्य साजरा करण्यात येणारा कार्यक्रम दहीहंडीला साहसी खेळात समाविष्ट केले. त्याचबरोबर गोविंदांना सरकारी नोकरीत आरक्षण देण्याची घोषणासुद्धा केली.

प्रत्येक सण समारंभ उत्साहात साजरा करण्याचीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. या सर्व घोषणांसोबतच आता आणखी एक घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. सर्व मुंबईकरांना २ ऑक्टोबर पासून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना आणि पॉलिक्लिनिकच्या माध्यमातून मोफत आरोग्य सेवा मिळणार आहे.

मुंबईत २२७ आरोग्य केंद्र सुरु करण्यात येणार आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात ५० आरोग्य केंद्र सुरु करण्यात येईल, अशी सर्वसामान्यांसाठी हिताची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. २५ ते ३० हजार लोकांसाठी एक क्लिनिक अशा पद्धतीने नियोजन केले आहे. या दवाखान्याची वेळ सकाळी ७ ते २ आणि दुपारी ३ ते रात्री १० ठेवण्यात येणार आहे.

या दवाखान्यात एक एमबीबीएस डॉक्टर आणि वैद्यकीय स्टाफ, नर्स असणार आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे या निर्णयाबाबत एकनाथ शिंदे यांनी आढावा बैठक घेतली. ही बैठक मंगळवारी पार पडली. या आरोग्य केंद्रामध्ये १३९ वैद्यकीय चाचण्या मोफत करण्यात येणार आहे. मुंबई येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यासाठी मोबाईल मेडिकल युनिटची संख्या वाढवावी.

मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सादरीकरण करताना सांगितले की, सध्या ५० क्लिनिकचे काम पार पडले आहे. एकूण २२७ क्लिनिक असणार आहे, त्यापैकी ३४ पॉलिक्लिनिक आहेत. पॉलिक्लिनिक अडीच ते तीन लाख लोकसंख्येसाठी असणार आहे. रुग्णांना ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे.

शासनाकडून आरोग्याबाबतच्या अनेक मोफत सुविधा राबविल्या जातात. सर्वसामान्यांना मोठमोठ्या आजारांवर उपचार न मिळाल्याने अनेकांना जीव गमवावा लागतो. उपचारविणा कोणाचा मृत्यू होऊ नये म्हणून राज्यशासन आणि केंद्रशासनाकडून अनेक योजना राबविल्या जातात. त्यापैकीच एक म्हणजे ही मोफत उपचार सेवा आहे.

महत्वाच्या बातम्या
Congress: अखेर काँग्रेस फुटलीच! माजी मुख्यमंत्र्यांसह तब्बल आठ आमदार करणार भाजपमध्ये प्रवेश 
Audio clip : पोलीस इन्सपेक्टरने मराठा समाजाबाबत आक्षेपार्ह गरळ ओकली; आॅडीओ क्लिप व्हायरल, मराठे आक्रमक
Foxconn : फॉक्सकॉन गुजरातला पळवल्यामुळे मराठी माणूस भडकल्यावर नरमले मोदी; महाराष्ट्राला दिले ‘हे’ आश्वासन
BJP : भाजपचा शिंदेंना दे धक्का! शिवसेनेचा आमदार असलेल्या अंधेरी विधानसभेसाठी भाजपने उमेदवार केला जाहीर

आरोग्य इतर ताज्या बातम्या तुमची गोष्ट राज्य

Join WhatsApp

Join Now