Share

PUBG मध्ये वारंवार जिंकायचा म्हणून तिघांनी मिळून साहिलचा केला खून, ठाण्यातील धक्कादायक घटना

pubg game

पब्जी या ऑनलाइन गेममुळे अनेक तरुणांनी आपला जीव गमवला आहे. पब्जी गेम खेळताना अनेकदा तरुणांमध्ये खटके उडतात. आणि नंतर शाब्दिक वादाचे रूपांतर मारमारीत होते. अशीच एक धक्कादायक घटना ठाण्यात घडल्याचे उघडकीस आले आहे. यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.

पब्जी (pubg game) खेळात वारंवार जिकंण्यावरून हा वाद झाल्याची माहिती मिळाली आहे. साहिल बबन जाधव (sahil jadhav murder) (वय 22) असं या तरुणाचं नाव आहे. तीन अल्पवयीन तरुणांनी चाकू, सुरे, तलवारीने प्राणघातक हल्ला केला. या प्रकरणी सध्या आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

जाणून घ्या नेमकं प्रकरण काय.. पब्जी खेळात साहिल जाधव हा तरुण तरबेज होता. तिन्ही आरोपी हे संगनमत करीत पब्जी खेळात साहिल जाधव याला नेहमी किल करीत होते. यावरूनच 2019 मध्ये साहिल आणि अटक झालेल्या तिन्ही आरोपींमध्ये वाद झाला होता, अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.

हाच राग डोक्यात धरून प्रणव प्रभाकर माळी, राहुल महादेव गायकवाड आणि गौरव रवींद्र मिसाळ यांनी एकत्र येऊन साहिल जाधव याला मारण्याचा डाव आखला. तसेच1 मार्चच्या पहाटे तलवारीच्या सहाय्याने साहिल याला जानकीदेवी चाळ, जुनी पाईपलाईन जवळ गाठून त्याच्यावर हल्ला केला.

या प्राणघातक हल्ल्यात साहिलचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच तरुण मुलाच्या मृत्यूने कुटुंबियावर दु: खाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, ऑनलाइन गेमच्या व्यसनाने अनेक धक्कादायक घटना घडल्याचे यापूर्वी देखील अनेकदा उघडकीस आले आहे. याचबरोबर यामधून गुन्हेगारीत देखील वाढ होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र पालक वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
‘पती सीमेवर तैनात आहे तुम्ही परपुरूषासोबत हॉटेलमध्ये’, सुप्रीम कोर्टाने महिलेला फटकारले; वाचा नेमकं काय घडलं..
ज्यांना मुलबाळ नाही त्यांना वेदना काय कळणार? नाना पटोलेंचा पंतप्रधान मोदींना टोला
शेतकऱ्याच्या झोपडीला आग; आयुष्यभर कष्टाने जमवलेली लाखो रूपयांची रोकड डोळ्यादेखत जळाली
भाजप खासदारावर कार्यकर्त्यानेच केले कोट्यावधींच्या फसवणूकीचे आरोप; वाचा पुर्ण प्रकरण…

इतर क्राईम ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now