काही दिवसांपूर्वी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेला 100 कोटी रुपये वसूल करण्याचं टार्गेट दिल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनीही देशमुखांवर गंभीर आरोप केले होते.
माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांच्या टेलरबॉम्बने खळबळ उडवून दिली. प्रकरणानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. आता अशातच एका लेटर बॉम्बने पुन्हा एकदा खळबळ आहे. हे पत्र पोलीस दलातील अधिकाऱ्याने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं आहे.
वाचा नेमकं प्रकरण..? पिंपरी चिंचवडचे माजी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या कार्यकाळात त्यांनी केलेला कथित गैरव्यवहार मांडणारे चार पानांचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार, सहायक पोलीस निरीक्षक अशोक डोंगरे यांनी संबंधित पत्र लिहिलं असल्याचं बोललं जातं आहे.
मात्र त्यांना याबाबत विचारलं असता ‘प्रत्यक्षात हे पत्र आपण लिहिलं नाही,’ असा दावा डोंगरे यांनी केला आहे. तसेच यावर अधिक बोलण्यास डोंगरे यांनी टाळाटाळ केली. याचबरोबर काही दिवसांपूर्वीच आयपीएस कृष्णप्रकाश यांची बदली झाली होती. बदली झाल्यानंतर ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या भेटीसाठी गेले असल्याची देखील माहिती हाती आली आहे.
वाचा काय म्हंटल आहे त्या व्हायरल पत्रात..? पत्रात असे म्हटले आहे की, ‘कृष्ण प्रकाश यांनी दीड वर्षात केलेल्या चुकीच्या कामात मला गोवण्याची शक्यता आहे. कृष्ण प्रकाश यांनी सामाजिक सुरक्षा हे स्वतंत्र पथक स्थापन करून त्याचे प्रमुख पद दिले. सामाजिक सुरक्षा पथकाच्या बरोबरीने वाचक शाखेचे काम बघण्यास सांगण्यात आले.’
दरम्यान, पत्रातून एक खळबळजनक दावा करण्यात आला आहे. ‘पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तपदी कार्यरत असताना जमीन खरेदी विक्री प्रकरणी कृष्ण प्रकाश यांच्यासाठी २०० कोटी पेक्षा अधिक रक्कम गोळा केल्याचा दावा पत्रातून करण्यात आला आहे. हे पत्र डायरेक्ट मुख्यमंत्र्यांनाच पाठविण्यात आले आहे. सध्या यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चाना उधाण आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
‘आई..लवकर घरी परत येईन’ असं सांगून गेलेल्या वैष्णवीचा मृतदेहच आला घरी; काळजाचा ठोका चुकवणारी घटना
अखेर ठरलं! ‘या’ दिवशी OTT वर रिलीज होणार KGF 2, तब्बल ३२० कोटींना विकले गेले डिजिटल हक्क
मनसेला बालेकिल्ल्यातच खिंडार! दोन नगरसेवकांसह ‘हा’ मोठा नेता शिवसेनेत प्रवेश करणार
खूपच ग्लॅमरस अवतारात दिसली सारा तेंडुलकर, फोटो सोशल मीडियावर व्हायरल; पहा फोटो