Share

‘झुंड’ मुळे बदललं २० वर्षाच्या मुलाचं आयुष्य; मानले नागराज मंजुळे याचे आभार

सध्या नागराज मंजुळे नाव ग्रामीण भागात ज्या गतीने प्रसिद्ध झाले, तेवढेच शहरी भागात देखील झाले. त्यांच्या चित्रपटांनी सामान्य लोकांच्या तसेच मोठे अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक यांच्या मनात देखील एक वेगळी जागा निर्माण केली आहे. त्यांनी चित्रपटात नवीन सर्वसामान्य कलाकारांना संधी देऊन त्यांचे आयुष्य बदललं आहे.

नागराज मंजुळे दिग्दर्शित सिनेमांनी केवळ सिनेसृष्टीतच नाही तर सर्वसामान्यांच्या आयुष्यातही काही महत्त्वपूर्ण बदल घडवून आणले. नागराज यांनी फँड्री, सैराट या चित्रपटात रिंकू राजगुरू,सोबतच अनेक नवीन कलाकारांना संधी दिली आज त्यांचे आयुष्य बदलले. आता त्यांनी ‘झुंड’ च्या निमित्ताने देखील अनेक कलाकारांना संधी दिली. या सिनेमामुळे एका 20 वर्षीय मुलाचं आयुष्य बदललं आहे.

प्रेम येलमलवार असं या मुलाचं नाव असून, त्याने झुंड’ हा सिनेमा प्रदर्शित झाल्याच्या निमित्ताने फेसबुकवर पोस्ट लिहित त्याच्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वपूर्ण अनुभव सांगितला आहे. त्याने ‘झुंड’ चित्रपटात नागराज यांच्यासोबत काम केलं आहे. त्यामुळे त्याचं आयुष्य कसं बदललं हे त्यानं पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केलं आहे.

त्याने फेसबुकवर या संदर्भात मोठी पोस्ट लिहिली आहे. तो म्हणतो, “माझ्या ताईसोबत मी थिएटरमध्ये सैराट हा सिनेमा पाहिला होता आणि तेव्हापासून नागराज मंजुळेंच्या कामाशी माझी ओळख झाली. सैराट पाहून मी हरखून गेलो होतो, त्यामुळे नागराज यांना भेटण्याची इच्छा झाली.

त्यानंतर मी त्यांचा ‘फँड्री’ हा चित्रपट देखील पाहिला आणि नागराज सरांचा जबरा फॅन झालो. मला त्यांना भेटण्याची खूप इच्छा होती. पण कधी विचार नव्हता केला की माझी त्यांच्याशी भेट ‘झुंड’ सारख्या चित्रपटादरम्यान होईल आणि मला त्यांच्यासोबत काम करायला मिळेल.

https://www.facebook.com/100018977523057/posts/973424229966819/

मी मनापासून नागराज मंजुळे सरांचे आभार मानतो की त्यांनी माझ्यासारख्या एका 20 वर्षीय मुलाला दिग्दर्शन टीममध्ये जागा दिली आणि मला फिल्ममेकिंग शिकण्याची संधी दिली. मी तर कधी फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये जाऊ शकलो नसतो, मात्र ‘झुंड’ मुळे मला जवळपास सर्व फिल्ममेकिंग प्रोसेस समजली.

झुंड हा केवळ माझ्यासाठी सिनेमा नाही, तर आयुष्य बदलून टाकणारा अनुभव आहे. विक्रांत पवार आणि कुटुब इनामदार यांच्यासोबत काम करून मला बरंच काही शिकायला मिळालं. आटपाट टीमचेही आभार, ज्यांनी मला खूप प्रेम आणि सन्मान दिला. पोस्टच्या माध्यमातून त्याने सर्वांचे आभार मानले.

इतर

Join WhatsApp

Join Now