Share

राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेआधीच मनसेला भलेमोठे भददाड; २० पदाधिकारी बांधणार शिवबंधन

raj thackeray

सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 22 मे रोजी पुण्यात जाहीर सभा होणार आहे. मात्र यं सभेपूर्वीच पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी मनसेला जबर धक्का बनवणारी आहे. तब्बल 20 कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.

यामुळे राज यांच्या सभेपूर्वीच पुण्यात मनसेला भलेमोठे भगदाड पडणार आहे. शिवसेना संपर्कप्रमुख सचिन अहिर यांच्या उपस्थितीत मनसेचे २० पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती पुण्यातील शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे यांनी दिली आहे. यामुळे सध्या मनसेच्या गोटात खळबळ उडाली आहे.

उद्या राज ठाकरेंची सभा पुण्यात पार पडणार आहे. राज ठाकरेंच्या सभे दिवशीच हे कार्यकर्ते शिवसेना नेते सचिन आहेर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. मात्र यावर अद्याप मनसे नेत्याकडून प्रतिक्रिया आलेली नाहीये.

याबाबत माध्यमांशी बोलताना संजय मोरे म्हणाले, ‘राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कामाचे कौतुक होत आहे. यामुळेच इतर पक्षातील अनेक जण शिवसेनेत येण्यासाठी आता इच्छूक आहेत. जे पदाधिकारी शिवसेनेत येत आहेत आम्ही त्यांचे स्वागत करतोय, असं मोरे यांनी म्हंटलं आहे.

दरम्यान, पुण्यातील मनसेचे माथाडी कामगार सेनेचे शहराध्यक्ष आणि वसंत मोरेंच्या कट्टर कार्यकर्ता अशी ओळख असलेले निलेश माझीरे मनसे सोडणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. ते मनसेतून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची देखील माहिती मिळत आहे.

अलीकडेच त्यांनी शिवसेनेचे संपर्कनेते सचिन अहिर यांची देखील भेट घेतली होती. तसेच येत्या दोन दिवसांत माझीरे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चानी उधाण आलं आहे. पक्षातील अंतर्गत वाद आणि गटबाजी यामुळे निलेश माझीरे पक्षाला रामराम ठोकणार असल्याच बोललं जातं आहे.

मात्र यावर खुद्द निलेश माझीरे यांनी स्पष्टीकरण दिले. त्यांनी याबाबत फेसबुकवर पोस्ट शेअर करीत सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे. “माझ्या विरोधात हे कटकारस्थान आहे,” असं म्हणत माझीरे यांनी पक्षांतराच्या चर्चाना पूर्णविराम दिला आहे. ‘मी वसंत मोरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडणार नाहीये,’ असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या
‘देशात रॉकेल शिंपडण्याचे काम भाजपचं, तर काँग्रेसकडे आग विझविण्याची जबाबदारी,’ राहुल गांधी स्पष्टच बोलले
ताजमहालाचा वापर एकेकाळी मराठ्यांनी घोडे बांधायला केला होता; वाचा मराठ्यांच्या पराक्रमाचा भन्नाट किस्सा
लाल महालातील लावणीचा वाद! अखिल भारतीय मराठा महासंघ आक्रमक; गौमूत्राने केले शुद्धीकरण
हल्मेट घालूनही चालकाला भरावा लागू शकतो २००० रुपयांपर्यंत दंड; जाणून घ्या काय आहे नियम

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now