Share

२० कोटी देते पण माझ्याशी लग्न कर, चाहतीच्या या विचित्र मागणीवर कार्तिक आर्यनने दिले ‘हे’ मजेशीर उत्तर

प्रत्येकाचा कोणताना कोणता आवडता सेलिब्रेटी असतो, ज्याच्यासोबत त्याला लग्न करावे वाटत असते. असाच एक सेलिब्रिटी सध्या चर्चेत आला आहे, ज्याला बॉलीवूड मधील चॉकलेट बॉय म्ह्णून ओळखले जाते. या अभिनेत्याला सध्या त्याच्या एका चाहत्याने 20 कोटींचे आमिष दाखवत त्याच्यासोबत लग्न करण्याची मागणी घातली आहे.

बॉलीवूड मधील हा चॉकलेट बॉय दुसरा तिसरा कोणी नसून कार्तिक आर्यन आहे. अनेक तरुणी त्याच्या प्रेमात पडलेल्या आहेत. अनेक तरुणींच्या गळ्यातील ताईत तो बनला आहे. अनेक तरुणी त्याच्यासोबत आपले आयुष्य घालवू इच्छित आहेत. अशाच एका तरुणीने कार्तिकला लग्नाची मागणी घातली आहे.

नुकताच, कार्तिकने इंस्टाग्राम हँडलवर त्याच्या छोट्या सहकलाकारासह एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये बालकलाकार त्याच्या चित्रपटातील डायलॉग बोलताना दिसत आहे. कार्तिकने हा व्हिडिओ शेअर केल्यावर चाहत्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया या व्हिडिओवर येताना पाहायला मिळत आहेत.

यावेळी एका चाहत्याने दिलेली प्रतिक्रिया पाहून, सगळेच चकीत झाले आहेत. सध्या या चाहत्याची ही प्रतिक्रिया प्रचंड व्हायरल होत आहे. चाहत्याने कमेंटमध्ये कार्तिकला लग्नाची मागणी घातली आहे आणि लिहिले, कार्तिक माझ्याशी लग्न कर, त्या बदल्यात मी तुला 20 कोटी देईन.

यावर चॉकलेट बॉय कार्तिकने अतिशय मजेशीर उत्तर दिलं आहे. कार्तिक ने तिला उत्तर दिले आहे, म्हणाला कधी करणार लग्न? कार्तिकच्या या उत्तराने सर्व चाहते चकीत झाले आहेत. कार्तिकने प्यार का पंचनामा चित्रपटात काम केल्यानंतर त्याचं मोठं फॅन फॉलोविंग तयार झालं आहे.

कार्तिक आर्यन हा सैफ अली खानची मुलगी सारा अली खान सोबत रिलेशनशिपमध्ये आहे असे म्हटले जाते. त्यांचा एक चित्रपटही प्रदर्शित झाला होता. तो काही फारसा चालला नाही. आता सोशल मीडियावर कार्तिक आर्यन हा चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी कार्तिक आर्यन हा करण जोहरसोबत घेतलेल्या पंग्यामुळे नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत होता.

मनोरंजन

Join WhatsApp

Join Now