एकाच बॉयफ्रेंडसाठी २ तरुणींची रस्त्यात मारामारी; भांडणात एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, पहा व्हिडीओ

सोशल मीडियावर प्रेमाचे अनेक आगळेवेगळे किस्से वाचायला आणि पाहायला मिळतात. प्रेमासाठी लोक वाट्टेल ते करायला तयार असतात, याची जाणीव आपल्याला नक्कीच झाली आहे. त्यात एकतर्फी प्रेमाचे किस्से बरेच असतात, त्यातून अनेकदा क्राईम होताना देखील पाहायला मिळतो.

एकतर्फी प्रेम म्हणजे, एकाच तरुणीवर किंवा तरुणावर खूप जणांचे प्रेम असणे. त्या व्यक्तीला मिळवण्यासाठी मग संबंधित प्रेम करणारी व्यक्ती वाट्टेल ते करायला तयार असते. अशी एक घटना उत्तराखंड मध्ये घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओमध्ये एकाच बॉयफ्रेंडकरीता २ तरुणी एकमेकांशी भिडल्याचा धक्कादायक प्रकार पाहायला मिळत आहे. या दोन तरुणींच्या मैत्रिणी देखील यात सहभागी होताना दिसत आहेत, आणि एकमेकींचे केस ओढताना, मारताना दिसत आहेत.

माहितीनुसार, उत्तराखंडच्या हालदाणीतील हिरा नगर परिसरात हा भयंकर प्रकार घडला आहे. एका बॉयफ्रेंडसाठी २ तरुणी एकमेकांच्या जीवावर उठल्याचे दिसत आहे. दोघीही तरुणींमध्ये हाणामारी झाली असून त्या रस्त्यातच आपसात भिडल्या आहेत.

यात संबंधित तरुणींच्या मैत्रिणी देखील हातात काठी घेऊन एकमेकींना मारताना दिसत आहेत. एकमेकींच्या झिंज्या उपटताना दिसत आहेत. तरुणींचा हा सर्व प्रकार भर रस्त्यात सुरू आहे. सध्या या व्हिडीओची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरू आहे.

https://twitter.com/askbhupi/status/1546751468010704896?t=iANKYn4dwq_NaaYUl8pbEQ&s=19

उत्तराखंडच्या हालदाणीतील हिरा नगरच्या पोलीस योगा पार्कातील हि घटना आहे. हे भांडण सोडवण्याचा प्रयत्न तिथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी केला. @askbhupi ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला गेला आहे. सध्या या व्हिडिओवर अनेक मजेशीर प्रतिक्रिया नेटीझन्स पोस्ट करत आहे.