Share

फोटोशूट भोवलं! ‘मला माझं बाळ आणून द्या,’ आईच्या एका चुकीमुळे बाळाचा बुडून मृत्यु

child (1)

सोशल मिडियावर फेमस व्हायच्या नादात आता लहान मुलांपासून ते वृद्ध नागरिकांनपर्यंत सर्वांनाच फोटो, व्हिडिओचा नाद लागला आहे. फोटोच्या नादात अनेकांचे भान हरवून जाते. मात्र यातून अनेकदा धक्कादायक घटना घडल्याचे आपण वाचले आहे. अशीच एक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे.

आईच्या फोटो शूटच्या नादात २ वर्षाच्या तिच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. ही घटना आहे थायलंडमधील. 26 वर्षीय वियाडा पोंटावी एडल्ट साईट Onlyfans ची मॉडेल आहे आणि तिचा पती फोटोग्राफर आहे. व्हॅलेंटाईन डेच्या पार्टीच्या उद्देशाने साईटसाठी फोटोशूट सुरू होतं. या पार्टीत अनेक एडल्ट मॉडेल फ्रेंड्सही होते.

वियाडा पोंटावी ही पुलाच्या समोरच फोटोशूट करत होती. तिचा २ वर्षांचा मुलगा तिच्या शेजारी खेळत होता. वियाडा पोंटावी ही फोटो काढण्यात मग्न होती. खेळता – खेळता तिचा २ वर्षांचा मुलगा स्विमिंग पुलमध्ये बुडाला. अचानक बाळाच्या आई – वडिलांचे लक्ष गेले असता त्यांनी स्विमिंग पुलकडे धाव घेतली.

त्यांनी बाळाला बाहेर काढले. त्याला जवळच्या रुग्णालयातही नेण्यात आलं. मात्र बाळाच्या तोंडात पाणी शिरल्याने बाळाचा मृत्यू झाला. आईची एक लहान चूक बाळाच्या जिवावर बेतली. बाळाच्या मृत्यूची बातमी समजताच आईने हंबरडा फोडला. ‘माझे बाळ मला आणून द्या,’ अशी मागणी तिने पतीकडे केली.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, 26 वर्षीय वियाडा पोंटावी एडल्ट साईट Onlyfans ची मॉडेल आहे. ती पार्टीसाठी शूट करत होती. फोटोग्राफर तिचा नवरा होता. हे दोघे ही फोटो शूटमध्ये व्यस्त होते. त्यांच बाळाकडे दुर्लक्ष झालं. आणि त्यांच्या या एका चुकीने बाळाचा मृत्यू झाला.

अवघ्या दोन वर्षाच्या बाळाचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांवर दु: खाचा डोंगर कोसळला आहे. तसेच परिसरात देखील हळहळ व्यक्त केली जात आहे. एडल्ट साईट Onlyfans ची मॉडेल वियाडा पोंटावी हिला आता आपला मुलगा परत हवा आहे. मुलाच्या मृत्यूमुळे तिला मोठा धक्का बसला आहे.

महत्त्वाच्या बातम्या
मुलगी झाली हो! तब्बल दीड क्विंटल जिलेबी वाटून समाजापुढे ठेवला नवा आदर्श, स्त्री जन्माचे अनोखे स्वागत
बप्पी दा इतकं सोनं का घालायचे? त्यांच्याकडे सगळे मिळून किती सोनं होते? वाचून थक्क व्हाल
विहीरीजवळ नाचगाणे करणे पडले महागात, 13 जणांचा विहीरीत पडून मृत्यु, ऍम्बुलन्सलाही झाला उशीर
कौतुकास्पद! या शिक्षकाच्या पुढाकाराने वाचले 3 लाख प्लेट जेवण, 350 मुलांच्या पोटाचा प्रश्न मिटला

इतर क्राईम

Join WhatsApp

Join Now