Share

नागिन-६ मध्ये झाली २ हॅन्डसम हिरोंची एन्ट्री, मौनी रॉयसोबत ‘हे’ टिव्ही स्टार्स करणार काम

एकता कपूर (Ekta Kapoor)लवकरच तिच्या अलौकिक शो नागिनचा सहावा सीझन दाखल करणार आहे. लवकरच एकता कपूर नागिन 6 च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. अशा परिस्थितीत नागिनच्या चाहत्यांचा उत्साह सातव्या गहरावर पोहोचला आहे. नागिन 6 मधील नवीन नाग नागिन कोण आहे हे चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे. (2 handsome heroes enter Nagin-6)

यापूर्वी अनेक स्टार्सची नावे नागिन 6 शी जोडली गेली आहेत. नागिन 6 च्या निर्मात्यांनी नवीन सीझनसाठी अनेक टीव्ही स्टार्सशी संपर्क साधला आहे. दरम्यान, नागिन 6 च्या कलाकारांबाबत मोठा खुलासा झाला आहे. ताज्या माहितीनुसार, एकता कपूरने नागिन 6 चे कलाकार फायनल केले आहेत. चला जाणून घेऊया नागिन 6 च्या कलाकारांच्या यादीत कोणत्या स्टार्सचा समावेश आहे.

मौनी रॉय (Mouni Roy)- टेलिचक्करच्या एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की मौनी रॉय नागिन 6 मध्ये ग्रँड एन्ट्री करू शकते. मौनी रॉय नागिन 6 च्या सुरुवातीच्या भागात दिसणार आहे. सध्या मौनी तिच्या लग्नाच्या कार्यक्रमांमध्ये व्यस्त आहे. तिच्या हळदीचे फोटो सोशल मिडीयावर धुमाकूळ घालत आहे.

तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash)- बिग बॉस 15 मध्ये दिसलेली तेजस्वी प्रकाश हिलाही नागिन 6 साठी फायनल करण्यात आले आहे. बिग बॉस संपताच तेजस्वी प्रकाश नागिन 6 चे शूटिंग सुरू करणार आहे. तिचे चाहते तिला पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

शाहीर शेख (Shaheer Sheikh)- बातम्यांनुसार, पवित्र रिश्ता स्टार शाहीर शेखचीही नागिन 6 मध्ये एन्ट्री झाली आहे. शाहीर शेख नागिन 6 मध्ये एक छोटीशी भूमिका साकारताना दिसणार आहे. ही बातमी समजताच शाहीर शेखचे चाहते उत्सुक झाले आहे. तुम्हाला सांगू इच्छितो की, बऱ्याच दिवसांपासून शाहीर शेखचे नाव नागिन 6 शी जोडले जात आहे.

उर्वशी ढोलकिया (Urvashi Dholakia)- नागिन 6 साठी उर्वशी ढोलकियाचे नाव फायनल झाले आहे. ताज्या माहितीवर विश्वास ठेवला तर उर्वशी ढोलकिया नागिन 6 मध्ये महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. उर्वशी ढोलकिया चार वर्षांनंतर नागिन 6 मधून टीव्हीवर परतणार आहे.

सिद्धांत गुप्ता (Sidhant Gupta)- नागिन 6 मध्ये सिद्धांत गुप्ता मुख्य भूमिकेत झळकणार असल्याचा दावाही केला जात आहे. याआधी मुख्य भूमिकेसाठी ईशान सहगलचे नाव पुढे येत होते.

सुधा चंद्रन
या यादीत पुढचे नाव सुधा चंद्रन यांचे आहे. सुधा चंद्रन यांनी नागिन सीझन एक आणि दोनमध्ये काम केले आहे. आता सुधा चंद्रन ‘नागिन 6’ ला धमाल करणार आहेत.

सिम्बा नागपाल
अलीकडेच, बिग बॉस 15 स्टार सिम्बा नागपालला नागिन 6 मध्ये काम करण्याची ऑफर मिळाल्याची बातमी आली आहे. मात्र, अद्याप निर्मात्यांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.

महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी : भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द; सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला दणका
श्वेता तिवारीचे वादग्रस्त वक्तव्य; अंडरगारमेंटला देवाशी जोडले, म्हणाली, ‘देव माझ्या ब्रा ची…’
फडणवीसांची शिष्टाई अपयशी! उत्पल पर्रिकरांचा पणजीतून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल
घरी कोणीही नसताना १० वर्षांच्या मुलाने घरातच घेतली फाशी, टीव्हीवर रोज पाहायचा क्राईम पेट्रोल

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now