raj thackeray : यंदा इतिहास पहिल्यांदाच शिवसेनेचे दोन मेळावे पार पडणार आहेत. या राजकीय वर्तुळासह अवघ्या राज्याचं लक्ष या दसरा मेळाव्याकडे लागलं आहे. राजकीय नेते मंडळी देखील या मेळव्यांची आतुरतेने वाट पाहत आहेत. सत्तांतरानंतर पहिल्यांदाच होणार दसरा चर्चेचा विषय बनला आहे.
या दसरा मेळव्यांच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन्हीही मेळव्यांना कोण – कोण उपस्थित राहणार? हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अनेक मुद्यांनी यंदाचे दसरे मेळावे चर्चेत आहेत.
यामध्ये मनसेची भूमिका देखील तेवढीच महत्त्वाची असणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे कोणासोबत जाणार? असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. याचबरोबर दसरा मेळाव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोणाला पाठिंबा देणार याकडे देखील सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
अशातच एक वेगळी आणि मोठी बातमी समोर आली आहे. दसऱ्याच्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुंबईत थांबणार नसल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दसऱ्याच्या दिवशी राज ठाकरे नेमके कुठे जाणार? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दसऱ्याच्या दिवशी राज ठाकरे हे पुण्यात असणार असल्याची माहिती मिळाली आहे. खरं तर, शिंदे गटाकडून राज ठाकरे यांना देखील आमंत्रण दिलं जाणार असं बोललं जात होतं. मात्र ही शक्यता आता मावळली आहे. अशातच ही वेगळी बातमी समोर आली आहे.
दरम्यान, सध्या राजकीय वर्तुळात आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. तर दुसरीकडे दसरा मेळावा देखील चांगलाच चर्चेत आला आहे. इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेचे दोन दसरे मेळावे पार पडणार आहे. मेळाव्याच्या आधी वातावरण निर्मिती केली जातं आहे. भेटीगाठींचे सत्र रंगले आहे.