Share

करोडो घेऊन ‘या’ 8 खेळाडूंना भोपळाही फोडता नाही आला; यामध्ये 17 कोटी घेणाऱ्या प्लेअरचाही समावेश

आयपीएलच्या 15 व्या हंगामाला शनिवारपासून सुरुवात झाली आहे. या सामन्यात खेळाडूंची जोरदार बॅटिंग पाहिला मिळत आहे. परंतु याच सामन्यात दिग्गज आणि अनुभवी खेळाडू मात खाताना दिसले आहेत. आतापर्यंत 15 व्या हंगामात एकूण 8 फलंदाज शून्यावर बाद झाले आहेत. यातील 8 बॅट्समन पैकी काही असे खेळाडू आहेत ज्यांच्यावर 17 कोटी रुपयांची बोली लावण्यात आली आहे.

यंदाच्या सामन्यात दोन फलंदाज पहिल्याच बॉलवर आऊट झाले आहेत. तर पंजाब किंग्सकडून खेळणारा बॅट्समन राजा बावा आरसीबी विरुद्ध सुरु असलेल्या पहिल्याच बॉलवर आऊट झाला आहे. त्याच्यासोबतच गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात लखनऊ सुपरजायंट्सचा कॅप्टन केएल राहुल याने देखील पहिल्याच बॉलवर माती खाल्ली होती.

यानंतर, केकेआर विरुद्ध चौथ्याच बॉलवर चेन्नई सुपरकिंग्सचा स्टार ओपनर ऋुतुराज गायकवाड आऊट झाला होता. यासोबतच दिल्ली कॅपिट्ल्सचे दोन खेळाडू शून्यावर बाद झाले होते. इतकेच नव्हे तर, मुंबई विरुद्धच्या सामन्यात मनदीप सिंह आणि रोवमॅन पॉवेल हे पळ शून्यावर आऊट झाले होते.

पुढील सामन्यात लखनऊ विरुद्धच्या मॅचमध्ये गुजरात टायटन्सचा ओपनर शुबमन गिलने देखील पहिल्याच डावात माती खाल्ली. या दोघांनंतर राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबादचे निकोलस पूरन आणि राहुल ले. त्रिपाठी हे देखील शुन्यावर बाद झाले.

यातील काही खेळाडूंची 17 कोटी रुपयांवर बोली लावण्यात आली होती. परंतु त्यांनीच पहिल्यांदा निराशा केली. सध्या आयपीएलमध्ये सर्वच संघ विजयासाठी पूर्ण प्रयत्न करताना दिसत आहेत. आज लखनऊ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात लढत पाहिला मिळणार आहे.

मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 ला हा सामना सुरु होणार आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी दोन्ही संघ पुर्ण प्रयत्न करताना दिसत आहेत. हा सामना आपण disney+ hotstar तसेच हा सामना स्टार स्पोर्ट्सवर हिंदीत पाहू शकतो.

महत्वाच्या बातम्या
पुणे हादरलं! १७ वर्षीय अभिनेत्रीवर अश्लील व्हिडीओ बनवून दिग्दर्शकाने केला बलात्कार
जन्मताच बाळाला होती दोन डोकी आणि तीन हात, डॉक्टरांनी सांगितलेले कारण ऐकून आईला बसला धक्का
संशोधकांना मोठं यश, प्रेग्नेंसी टाळण्यासाठी आता महिला नाही तर पुरूष घेणार गर्भनिरोधक गोळी
‘हा’ खेळाडू टी-२० वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात सर्वात आधी निवडला जाणार, गावसकरांनी केली भविष्यवाणी

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now