Share

१४ वर्षीय मुलीने लोखंडी तव्याने केली जन्मदात्या आईची हत्या; कारण ऐकून पोलीसही हादरले

Crime

अलीकडे अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणत वाढ होताना पाहायला मिळत आहे. अशातच पुन्हा एका घटनेने खळबळ उडाली आहे. अवघ्या 14 वर्षीय मुलीने जन्मदात्या आईची हत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (14 year old girl brutally kills mother)

स्व: ता मुलीने याबाबत पोलिसांसमोर कबुली दिली आहे. त्याने सांगितले कारण ऐकून पोलिसांनाही जबर धक्का बसला. सध्या आरोपी मुलीला बेड्या ठोकण्यात आल्या असून पुढील तपास सुरू आहे. ही घटना दिल्लीनजीक नोएडा गौतमबुद्ध नगर परिसरात एका सोसायटीतमध्ये घडली आहे.

आईच्या चारित्र्यावरुन तिचे शाळेतील मित्र नेहमी टोमणे मारायचे. आई माझ्याशीही नेहमी वाद घालायची, याच रागातून कारणामुळे आईची हत्या केल्याची कबुली मुलीने पोलिसांना दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, या घटनेत वापरण्यात आलेला लोखंडी तवाही पोलिसांनी जप्त केला आहे.

जाणून घ्या नेमकं प्रकरण काय? आरोपी मुलीची आई नेहमी वाद घालायची. त्यामुळे ती नेहमी त्रस्त असायची. याच रागातून तिने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मुलीने कबुली दिल्यानुसार, आईवर हल्ला केला आणि भीतीपोटी मुलगी फ्लॅटच्या बाहेर निघून गेली.

तसेच काही वेळाने ती घरी आली आणि शेजाऱ्यांना सांगून कुणीतरी आईवर हल्ला केल्याची माहिती दिली. कुणीतरी आईला बेदम मारल्याचं ती म्हणाली. मात्र पोलिसांना मुलीवर संशय आला. त्यामुळे त्यांनी कसून चौकशी केली तेव्हा या मुलीने हत्येची कबुली दिली. सध्या या घटनेने खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या प्रकरणी मृत महिलेच्या भाऊ मुकेश राठोडनं भाचीविरोधात तक्रार दिली. त्यानंतर कलम ३०४ अंतर्गत गुन्हा नोंद करत पोलिसांनी आरोपी मुलीला ताब्यात घेतलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या शरीरावर २०-२२ वार केल्याच्या खूणा आढळून आल्या. तिचा कानही कापण्यात आला होता.

महत्त्वाच्या बातम्या
स्वतःच्या घरावर भाजपचा झेंडा बघून सपा उमेदवाराला बसला धक्का; रडत-रडत पडला बेशुद्ध, पहा व्हिडिओ
नशीबच पालटलं! एका रात्रीत ६० वर्षांचा मजूर झाला मॉडेल, स्टायलिश फोटो पाहून तुम्हीही व्हाल हैराण
रिद्धिमान साहाला धमकावणारा तो पत्रकार कोण? साहाच्या त्या ट्विटनंतर पुन्हा चर्चांना उधाण
विचित्र व्यायाम! 12व्या मजल्याच्या बाल्कनीत रेलिंगला लटकून करत होता व्यायाम, व्हिडीओने उडाली खळबळ

इतर क्राईम राज्य

Join WhatsApp

Join Now