Share

शिवसेनेत मोठा भूकंप! तब्बल १४ खासदार जाणार शिंदे गटात; दिल्लीत यादी तयार

शिवसेनेत मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ४० आमदारांच्या पाठोपाठ आता १४ खासदारही पक्षाविरोधात बंड करण्याच्या तयारीत असल्याचे समजते. त्यामुळे शिवसेनेला महाराष्ट्रात मोठी गळती लागल्याचे चित्र जवळजवळ स्पष्ट होत चालले आहे. (14 MPs will go to Shinde group; List prepared in Delhi)

४० आमदारांचा मोठा गट एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात वेगळा झाल्याने या गटाचा शिवसेनेतील अधिकाधिक खासदार आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न पडद्यामागून चालूच होता. काही खासदारांनी थेट समर्थन दर्शवले पण त्यांची संख्या कमी होती.

शिवसेनेचे लोकसभेत १८ खासदार आहेत. शिंदे गटाला समर्थन करणाऱ्या गटात योग्य ती संख्या पूर्ण होण्यासाठी दोन सदस्य कमी पडत होते. परंतु कोल्हापूरच्या दोन खासदारांनी हिरवा कंदील दाखवल्याने आता उघडपणे हा बंड घोषित होणार असल्याचे सांगितले जाते.

या १४ खासदारांची बंड करण्याची मानसिकता तयार होईपर्यंत, या सर्व गोष्टींबाबत गुप्तता पाळली गेली. परंतु आता सोमवारी राष्ट्रपती निवडणुकीत मतदान केल्यानंतर हा गट बंडाची घोषणा करणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत.

१४ खासदारांची एक वेगळी यादी तयार करण्यात आली आहे. राष्ट्रपती निवडणुकीत सोमवारी मतदान केल्यानंतर लोकसभा अध्यक्षांकडे आपल्या गटातील खासदारांच्या नावाची यादी स्वतंत्रपणे हा गट सोपवणार आहे.

या गटाच्या प्रतोदपदी भावना गवळी असणार आहेत. मागील काही दिवसांपूर्वी संजय मंडलिक आणि भावना गवळी यांनी थेट बंडाची भाषा केली होती. खासदारांच्या या बंडामुळे मात्र शिवसेनेचे कधी न भरून निघणारे मोठे नुकसान होईल, असे बोलले जात आहे.

महत्वाच्या बातम्या-
बायको रात्रीच स्वत:जवळ झोपू देत नव्हती, रागाच्या भरात पतीनं केलं असं काही की वाचून तुम्ही हादरल
बाबा वेंगा यांची तिसरी भविष्यवाणी खरी ठरणार? ‘या’ देशामध्ये दिसले एलियन्स; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
कोकणातील बड्या नेत्याचा शिवसेना नेतेपदाचा राजीनामा; गंभीर आरोप करत म्हणाले शिवसेनाप्रमुखांनी…

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now