Share

युपीत १३ वर्षीय बलात्कार पिडीतेवर पोलिसानेही केले अत्याचार; नोबेल विजेते सत्यार्थी भडकले, योगींना म्हणाले..

कैलाश सत्यार्थी हे सतत समाजाच्या भल्यासाठी आणि समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी लढा देत असतात. ते भारतीय बालहक्क चळवळकर्ते व २०१४ मधील नोबेल शांतता पारितोषिक विजेते आहेत. उत्तर प्रदेशमधील ललितपूर पोलीस स्टेशनमध्ये घडलेल्या घटनेवर त्यांनी पुन्हा तीव्र शब्दांत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये ललितपूर पोलीस स्टेशनमधील एका पोलीस अधिकाऱ्याने बलात्काराची तक्रार देण्यासाठी आलेल्या १३ वर्षीय चिमुकलीवरच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.यावर नोबेल पुरस्कार विजेते सामाजिक कार्यकर्ते कैलाश सत्यर्थी यांनी  आपली संतप्त प्रतिक्रिया आपल्या अधिकृत ट्विटरवरून  व्यक्त केली आहे. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे या घटनेवरील कारवाईची मागणी केली.

कैलाश सत्यर्थी म्हणाले, “बलात्काराची तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेलेल्या १३ वर्षीय मुलीवर पोलीस अधिकाऱ्याने बलात्कार केला. हा भारताच्या लोकशाहीवर कलंक आहे. ललितपुर पोलीस स्टेशनमधील प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करून संपूर्ण पोलीस स्टेशनवर कारवाई करावी. मुख्यमंत्र्यांनी कृपया हा कलंक पुसण्यासाठी कठोर पावलं उचलावीत.”

कैलास सत्यर्थी यांच्या या ट्वीटची दखल घेत ललितपूर पोलीस स्टेशनने एक निवेदन पोस्ट केले आहे. यात ललितपूर पोलीस अधीक्षक म्हणाले,
“पाली पोलीस स्टेशनमध्ये एका बलात्कार पीडितेने पोलीस अधिकाऱ्यांकडून बलात्काराचा आरोप केला. यानंतर तात्काळ या घटनेची दखल घेऊन सहा पोलीस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आलं. या प्रकरणातील सर्व प्रकारचे पुरावे गोळा केले जात आहेत.”

“झाशीवरून न्यायवैद्यक प्रयोगशाळेचं पथक (Forensic Laboratory Squad) आलं आहे. ते पुरावे गोळा करत आहेत. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात येऊन या प्रकरणाचा कसून तपास केला जात आहे. लवकरात लवकर दोषींवर कारवाई करण्यात येईल,” असं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या
महेश भट्टशी लग्न केल्यानंतर सोनी राझदानला झाला होता पश्चाताप? सावत्र मुलीने केला मोठा खुलासा
चित्रपटात काम करण्यासाठी आलेल्या ‘या’ अभिनेत्यांचा बदलला काळ, लवकरच कारकीर्द आली संपुष्टात 
नवी मुंबईत आगीचे तांडव! तब्बल नऊ कंपन्या जळून खाक
VIDEO : नुसरत भरुचाला कंडोम विकताना पाहून नेटकऱ्यांनी केले ट्रोल; अभिनेत्रीनेही दिले सडेतोड उत्तर, म्हणाली..

ताज्या बातम्या क्राईम

Join WhatsApp

Join Now