१२ जणांकडून तरूणीवर बलात्कार, मात्र कोर्टाने पिडीत तरूणीलाच ठोठावली शिक्षा; वाचा पुर्ण प्रकरण..

बलात्कार पीडित 21 वर्षीय युवतीला कनिष्ठ न्यायालयाने खोटे बोलल्याबद्दल दोषी ठरवले होते. तसेच तिला चार महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या तरुणीच्या बाजूने आता निर्णय देत तिच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर तरुणीच्या समर्थकांनी आनंद व्यक्त करत घोषणाबाजी केली आहे.

संबंधित घटना साइप्रस येथील असून, या देशातील सर्वोच्च न्यायालयाने 21 वर्षीय ब्रिटिश तरुणीच्या बाजूने निर्णय देताना शिक्षेला स्थगिती दिली आहे. याआधी, कनिष्ठ न्यायालयाने मुलीला खोटे बोलल्याबद्दल दोषी ठरवले आणि तिला चार महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. आपल्यासोबत सामूहिक बलात्काराची घटना घडल्याचा आरोप तरुणीने केला होता, मात्र कनिष्ठ न्यायालयाने या मुलीचे म्हणणे, पुरावे याकडे दुर्लक्ष करत शिक्षा सुनावली होती.

2019 मध्ये मुलीने पोलिसांना आपल्यावर 12 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचे सांगितले होते. यानंतर, 2020 च्या जानेवारीमध्ये न्यायालयात खटल्याच्या सुनावणी दरम्यान, मुलगी आणि तिच्या कायदेशीर टीमला बोलू दिले गेले नाही. तसेच, त्यांना पुरावे सादर करण्याची संधी दिली गेली नाही. याशिवाय या तरुणीलाच दोषी मानून चार महिन्यांची शिक्षा सुनावली.

मात्र,आता साइप्रसमधील कोर्ट ऑफ अपीलच्या ऐतिहासिक निर्णयानंतर मुलीच्या आईने सांगितले की, ही मोठी दिलासादायक बाब आहे. साइप्रसच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कायदेशीर प्रक्रियेतील त्रुटी ओळखल्या आहेत. मात्र, हा निर्णय पोलिस, न्यायाधीश किंवा अधिकाऱ्यांनी तिच्याशी केलेल्या वागणुकीला माफ करणार नाही. माझी मुलगी, ज्या गुन्ह्याला बळी पडली आहे, ती वेदना कमी होईल, अशी आशा आहे. साइप्रसमध्ये जमवलेल्या पुराव्याची तेथील अधिकारी दखल घेतील तेव्हाच माझ्या मुलीला पूर्ण न्याय मिळेल, असे तिने सांगितले.

यावेळी, तरुणीच्या शिक्षेवर निर्बंध आल्याचं वृत्त समजताच थंडी असूनही, निकोसिया येथील न्यायालयाबाहेर तरुणीचे समर्थक जमा झाले. येथे त्यांनी आनंदाने टाळ्या वाजवून दोषींना शिक्षा झालीच पाहिजे अशा घोषणा केल्या. काही लोकांच्या हातात फलक आणि बॅनर होते, ज्यावर “बलात्कार संस्कृती संपवा” असे लिहिले होते.

न्यायालयाच्या निर्णयानंतर पीडितेच्या वकिलाने सांगितले की, आम्ही मागणी करत आहोत की स्वतंत्र पोलिस पथक तयार करावे, त्यांनी बलात्काराचा तपास करावा. कोर्टानेही मान्य केले की, तरुणीच्या निष्पक्ष सूनवणीपासून वंचित ठेवलं आणि संपुर्ण प्रक्रियेचं उल्लंघन केलं होतं.

त्यांच्या आणखी एका वकिलाने सांगितले की, ही खूप आनंदाची बाब आहे. अखेर त्या मुलीला न्याय मिळाला. आशा आहे की या निर्णयाचा लैंगिक छळाच्या इतर बळींच्या प्रकरणांवर दूरगामी परिणाम होईल. या निर्णयाबद्दल साइप्रस सर्वोच्च न्यायालयाचे कौतुक केले.