Share

Youtube: ‘या’ गावातील १ हजार लोकं युट्यूबच्या जीवावर कमावतात प्रचंड पैसे; वाचा भन्नाट स्टोरी

youtuber

युट्युब (Youtube): इंटरनेटमुळे सर्वत्र मनोरंजनाची साधने वाढली आहेत. आधी फक्त टीव्ही, रेडिओ होता. आता तसं नाही. आता सगळ्यांकडे मोबाईल आहे. त्या मोबाईलचा वापर आता फक्त मनोरंजनाचे साधन म्हणूनच नाही तर पैसे कमावण्यासाठीही मोबाईल उपयोगात येत आहे. अलीकडे युट्युबर्सची संख्या भरपूर प्रमाणात वाढली आहे. कोरोना काळात घरबसल्या काय करावं, तर बहुतेक लोकांनी व्यवसाय म्हणून युट्युब चॅनल ओपन केले व एखादा कन्टेन्ट घेऊन त्यावर व्हिडीओ बनवले.

थोड्याच दिवसात ते यूट्यूबच्या माध्यमातून भरपूर पैसे कमवायला लागले. एका गावातील ३ हजार लोकसंख्येपैकी १ हजार लोक फक्त युट्युबच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह करतात. हे गाव रायपूर जिल्ह्यातील आहे. गावाचे नाव तुलसी आहे. या गावातील ३० टक्के लोकसंख्या यूट्यूबच्या माध्यमातून पैसे कमावतात. गेल्या २ वर्षापासून त्या गावात ४० युट्युब चॅनल आहेत.

त्या गावातील काही तरुणांनी नोकरी सोडून युट्युब चॅनल सुरु केले आहे. ज्ञानेश शुक्ला, जय वर्मा या दोघांनी नोकरी सोडून युट्युब चॅनल ओपन केले. ज्ञानेशच्या चॅनल वर २५० व्हिडीओ आहेत. १.५० लाख सबस्क्राईबर्स आहेत. ज्ञानेश आधी एसबीआयमध्ये नेटवर्क इंजिनिअर म्हणून काम करीत होता. जय वर्मा पार्ट टाईम शिक्षक म्हणून काम करीत होता. तेव्हा त्याचा पगार १२ हजार होता, आता तो ३० हजार ते ३५ हजारच्या दरम्यान कमावत आहे. याच युट्युबच्या माध्यमातून महिलांना काम करण्याची संधी मिळाली.

महिला सबलीकरणाला यातून मदत झाली असे पिंकी साहू यांचे म्हणणे आहे. पिंकी साहू यासुद्धा तुलसी गावातीलच आहे. महिलांना आधी काम करण्यात अडचणी आल्या पण आता त्या सर्व काम व्यवस्थित करीत आहे. गावातील महिलांना शेतीशिवाय दुसरे काम करायला परवानगी दिली जात नाही. पण शेतीची कामे सुद्धा किती महिलांना पुरणार त्यात रोजगारही कमी मिळतो.

त्यामुळे युट्युब चॅनल हे आमच्या गावातील महिलांसाठी लाभदायक ठरले. सुरवातीला अडचणी आल्या, त्या म्हणजे की कॅमेऱ्यासमोर येताना लाज वाटणं तसेच सार्वजनिक ठिकाणी अभिनय करताना अवघडल्यासारखं होत असल्याचं या दोघांनी सांगितलं. पण नंतर ही सर्व भीती गळून पडली आणि आता गावातील जवळपास सर्वच आता युट्यूबसाठी व्हिडिओ तयार करत आहेत आणि पैसे कमवत आहेत.

रामलीला आणि नाटक करण्यात इच्छुक असणाऱ्या मंडळींना हा एक उत्कृष्ट प्लॅटफॉर्म मिळाला. त्यांच्या कलेला वाव मिळायला लागला. गावातील ३० टक्के लोकांना रोजगार फक्त युट्युबमुळे मिळाला याचा आनंद वाटतो. यात लहान मुलं, वृद्ध व्यक्ती, तरुण, महिला, तरुणी या सर्वांचा समावेश आहे, असे पिंकी साहू यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या
Eknath Shinde : १२ आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी घेतला मोठा निर्णय; आता महाविकास आघाडी काय करणार?
Ajit Pawar : बबनराव पाचपुतेंना पाडायला अजित पवारांनी खेळला गेम; ‘या’ बड्या नेत्याला उतरवणार रिंगणात
Virat Kohali: पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर विराट-अनुष्का झाले इतके नॉटी, जीभ बाहेर काढून एकमेकांसोबत करू लागले..
‘पैशांसाठी धर्मही विकला’; गणपती बाप्पांची पूजा केल्यामुळे सारा अली खान झाली ट्रोल    

ताज्या बातम्या आर्थिक इतर शिक्षण

Join WhatsApp

Join Now