Share

शिंदे सरकारमध्ये मंत्रीपदासाठी १०० कोटींची ऑफर, आमदार अडकला जाळ्यात; पोलिसांनी उघड केले कारस्थान

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले. मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा जोर धरू लागल्या. परंतु पंधरा दिवस उलटून गेले, तरी मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. आमदारांच्या अपात्रतेबाबत शिवसेनेने कोर्टात जी याचिका दाखल केली होती. त्याचा निकाल अजून बाकी आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारातला विलंब होत असल्याचे बोलले जात आहे. (100 crore offer for minister post in Shinde government, MLA stuck in the net)

अनेक आमदारांच्या मंत्रिपदाच्या अपेक्षा दिवसेंदिवस वाढतच असताना याबाबत एक महत्त्वपूर्ण गोष्ट आता समोर येत आहे. पदाची अपेक्षा असणाऱ्या एका आमदाराला एका टोळक्याने कॅबिनेट मंत्रीपदाचं आमिष दाखवून पैसे उकळण्यासाठी एक सापळा रचला होता.

मुंबई क्राईम ब्रांचने आमदाराच्या खाजगी पीएने केलेल्या तक्रारीवरून ४ आरोपींना अटक केली आहे. रियाज शेख, सागर संगवई, योगेश कुलकर्णी, जाफर उस्मानी अशी त्या चौघांची नावे आहेत.

आमदाराच्या पीएला रियाज या आरोपीने फोन करत, आमची ४ वाजता आमदार साहेबांसोबत मिटींग आहे. परंतु ते फोन उचलत नाही. मी १०० कोटी रुपयांमध्ये कॅबिनेट मंत्री बनवतो अशी ऑफर दिली. सध्या दिल्लीमध्ये मंत्री पदासाठी ५०,६० कोटींचं मार्केट चालू आहे, असं तो म्हणाला.

संध्याकाळी आमदाराने पीएच्या माध्यमातून रियाजला फोन करत दक्षिण मुंबईमधील हॉटेलमध्ये त्याला भेटण्यासाठी बोलावले. दोघांची त्या ठिकाणी भेट झाली. ९० कोटींमध्ये सौदा फिक्स झाला. तेव्हा १८ कोटी ॲडव्हान्स द्यावेत, असे रियाजने म्हंटले. आमदाराने रियाजकडून एक दिवसाचा वेळ मागून घेतला. त्यानंतर घडलेला सर्व प्रसंग पीएला सांगितला.

पीएने मुंबई क्राईम ब्रांचमध्ये याची तक्रार नोंदवली. त्यानंतर आमदार आणि त्याच्या पीएने रियाजला नरिमन पॉईंट येथे एका कॅफेत भेटण्यासाठी बोलावले. रियाज आमदाराला भेटण्यासाठी नरिमन पॉईंट येथे आला असता साध्या कपड्यांमध्ये असलेल्या मुंबई क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून त्याला अटक केली आहे. पुढील चौकशीत इतर तिघांना अटक करण्यात आली.

महत्वाच्या बातम्या-
‘तु ठार वेडा आहेस, तुझ्या आसपास असल्याने..’ दिग्दर्शक विजू मानेंची कुशल बद्रिकेवर जाहीर पोस्ट
लाखो रुपये घेतले पण ‘ते’ कामच केलं नाही, अमिषा पटेलविरोधात वॉरंट जारी, होणार अटक?
शिवसेना पदाधिकाऱ्यांवर हल्ल्यांचे सत्र सुरूच; ठाकरे समर्थक कल्याण शहरप्रमुखावर जीवघेणा हल्ला

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now