Share

Salman Khan : बिग बॉससाठी १ हजार कोटीचे मानधन घेणार? सलमान खान म्हणाला, १ हजार कोटी मिळाले…

salman khan

Salman Khan : रुपेरी पडद्यावरील ‘बिग बॉस’ हा प्रसिद्ध शो होस्ट करण्यासाठी सलमान खानला मिळणाऱ्या मानधनाची कायम चर्चा असते. बिग बॉस शोचा १६वा सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा सलमान खानला या शोसाठी मिळणाऱ्या मानधनाची चर्चा सुरू झाली. प्रेक्षकांमध्ये होणाऱ्या चर्चेत जो आकडा बोलला जातो. तो ऐकून तुम्ही थक्क व्हाल.

बिग बॉस शोचे सूत्रसंचालन करण्यासाठी सलमान खानला तब्बल १००० कोटी रुपये या शोचे निर्माते मोजणार आहेत, अशी चर्चा मनोरंजन क्षेत्रात सुरू होती. सलमान खानने मात्र याबाबत मोठा खुलासा केला. सलमान खानने शेवटी त्याला मिळणाऱ्या मानधनाबद्दल माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली.

सलमान खान म्हणाला, ‘बिग बॉससाठी मला मिळणाऱ्या मानधनाबाबत जी चर्चा सुरू आहे. ती खोटी आहे. १००० कोटी रुपये मानधन जर मला असते. तर मी आयुष्यात कामच करणार नाही. परंतु एक दिवस असा नक्की येईल. जेव्हा मला एवढे मानधन मिळेल. मात्र एवढी फी मिळाली तरी माझा खर्चही भरपूर आहे. म्हणजे वकिलांवर होणारा खर्च. त्यांची मला जास्त गरज लागते. मला मिळणारे मानधन त्यांच्या कमाईचा एक चतुर्थांश भाग सुद्धा नाही.’

आयकर, ईडी विभागाचेही असेच रिपोर्ट्स आहेत,’ असे तो म्हणाला. सलमान खानने बिग बॉस शोबद्दल अनेक गोष्टी यावेळी सांगितल्या. ‘केव्हा तरी अशी वेळ येते, जेव्हा मी वैतागतो. शोच्या निर्मातांकडे जाऊन मला हा शो होस्ट करायचा नाही,’ असेही म्हणतो.

‘शोच्या निर्मात्याकडे माझ्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे ते परत माझ्याकडेच येतात. जर त्यांच्याकडे माझ्याशिवाय दुसरा पर्याय असता, तर अनेक वर्षांपूर्वीच त्यांनी माझ्या ऐवजी दुसऱ्या कुणाला आणले असते. निर्मात्यांकडे तसे कोणी नाही. व ते मला सोडत नाही. माझी जागा कोणीही घेऊ शकणार नाही,’ असे पण सलमान खान म्हणाला.

सलमान खानने तो सतत का चिडतो? याबद्दल सुद्धा सांगितले. ‘माझ्या रागाचा पारा चढतो. मला पातळी ओलांडावी लागते, कारण स्पर्धक आपली पातळी ओलांडतात. ते कशाप्रकारे बोलतात? याचे खरे फुटेज मी पाहिलेले असते. त्यामुळे मी संतापतो. मात्र प्रेक्षकांना ते दाखवू शकत नाही. त्यांना एडिट एपिसोड दिसतो,’ असेही सलमान खान म्हणाला.

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now