मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णी यांचे लग्न होऊन बरोबर १ महिना होत आहे. ३ मे रोजी हे जोडपं लग्नबंधनात अडकलं. त्यांच्या लग्नाच्या बातमीने मराठी सिनेमा इंडस्ट्रीत आनंदाची लहर उमटली होती. या कपलच्या लग्नाची जोरदार चर्चा झाली होती. एकमेकांच्या प्रेमात असणाऱ्या या दोघांनी अखेर लग्न केले. विराजस -शिवानी यांच्या लग्नाचे फोटो सोशल मिडियात धुमाकूळ घालत होते. (shivani rangole, virajas kulkarni, married, mrunal kulkarni, banmaska )
शिवानीने लग्नाला १ महिना पूर्ण झाल्याचा आनंद सोशल मीडियावर व्यक्त केला आहे. त्या निमित्ताने लग्नामधील काही अनसीन फोटोज् तिने शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये त्या दोघांचे सुंदर क्षण आहेत. धमाल मस्ती, काही थोडे हळवे क्षण त्यात आहेत. एकदम थाटात त्यांचा लग्न सोहळा पुण्यात पार पडला होता. त्यानंतर ग्रँड रिसेप्शन देण्यात आलं होतं.
शिवानी आणि विराजस दोघे मुळचे पुण्याचे आहेत. ‘डावीकडून चौथी बिल्डिंग’ या नाटकाच्या सेटवर दोघांची पहिली भेट झाली होती, शिवानीने त्यात अभिनय केला होता आणि त्या नाटकाचा दिग्दर्शक विराजस होता. त्यांची सुरुवातीला मैत्री झाली आणि नंतर त्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. ते दोघे अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. अखेर त्यांनी लग्न केले.
शिवानी रंगोळे तिच्या सहज सुंदर अभिनयासाठी ओळखली जाते. तिचा चाहता वर्ग मोठा आहे. विराजस उत्तम दिग्दर्शक असून अनेक नाटक, सिनेमांचे दिग्दर्शन त्याने केले आहे. मागील काही काळापूर्वी झी मराठीच्या ‘माझा होशील ना..’ मालिकेत विराजस कुलकर्णीने अभिनय केला होता. तो त्या मालिकेमुळे फार लोकप्रिय झाला.
‘हॉस्टेल डेज’ या सिनेमातून विराजसने मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. रमा माधव सिनेमात त्याने सहाय्यक दिग्दर्शन केले आहे. अनाथेमा या नाटकाचे लेखन, दिग्दर्शन त्यानेच केले आहे. याशिवाय मिकी, डावीकडून चौथी बिल्डिंग, भंवर या नाटकांचे लेखन आणि दिग्दर्शन त्याने केले आहे.
शिवानीचा अभिनय प्रवास लक्ष वेधून घेतो. ती ‘बनमस्का’ मालिकेतून फार लोकप्रिय झाली. सांग तू आहेस ना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरवगाथा या मालिकांमध्ये ती झळकली. दोघांच्या घरचे त्यांच्या या नात्यामुळे खूप आनंदी आहेत. विराजसची आई मृणाल कुलकर्णी शिवानीला मुलीसारखं वागवते.
महत्वाच्या बातम्या
सगळ्या एसयुव्हींचा बाप येतोय, स्काॅर्पिओच्या टिझरचा धुमाकूळ, गाडीचा लूक पाहून नजर हटणार नाही
अभिनेत्री वेदांगी झकळणार आता या नव्या भूमिकेत; ग्लॅमरस फोटोंनी केले चाहत्यांना घायाळ
भारताने मोठ्या मनाने चहाचे कंटेनर पाठवले पण त्यात व्हायरस आहेत म्हणत ‘या’ देशाने केले रिटर्न