Scorpions Poison: विंचवाच्या १ लिटर विषासाठी मोजावे लागतात तब्बल ८० कोटी, पण हे विष कोठे वापरतात?

(Scorpions Poison): विंचू म्हणजेच एक विषारी प्राणी. विंचवाने जर मनुष्यास दंश केला तर जीवघेणी वेदना होते. भारतात जवळपास १२० जातीचे विंचू आढळतात. सर्वात मोठा लांबीचा विंचू हा १८ ते २० सेमी लांबीचा असतो. महाराष्ट्रात विंचवाचे रंगानुसार दोन प्रकार आढळतात, काळा विंचू आणि लाल विंचू. काळा विंचू आकाराने मोठा असतो. परंतु हा कमी घातक असतो. काळा विंचू महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी आढळून येतो.

लाल विंचू मुख्यत: कोकणात सापडणारा आहे. या विंचवाने दंश केला तर सात काळ्या विंचवांनी दंश केल्यानंतर जेवढी वेदना होईल तेवढी वेदना या एका विंचवामुळे होते. यात दगावण्याची शक्यता सुद्धा असते. विंचू बघायला छोटासा दिसत असला तरी त्याचे विष प्राणघातक ठरू शकते. तो विषारी जरी असला तरीही अमेरिकेमध्ये विंचू पालन केले जाते. आपल्याकडे शेळी, कोंबडी पाळल्या जाते त्याचप्रमाणे तिथे विंचू पालन केले आहे.

मेदिन ओरॅनलेर यांचे हे विंचू पालन आहे. टर्कीएमध्ये प्रयोगशाळेत विंचवाचं विष जमा केलं जात. दिवसाला २ ग्रॅम इतके प्रमाण असते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या विषाचं काय करत असतील? तर या प्रश्नाचं उत्तर हेच की, विंचवाच्या विषाची विक्री केली जाते. टर्कीएमधील प्रयोगशाळेत विंचवांना बॉक्स बाहेर काढल्यानंतर तेथील कर्मचारी विंचू विषाचा थेंब सोडेपर्यंत वाट पाहतात. थेंब सोडला की त्याला गोठवला जातो. त्याचे पावडर बनवून विकले जाते.

पावडर विकण्यासोबतच वैद्यकीय उपचारांमध्ये विंचवाच्या विषाचा वापर थोड्या प्रमाणात केला जातो. विंचवाच्या विषाचे वैद्यकीय उपयोग कसे होऊ शकतात यावर गेल्या काही वर्षांपासून संशोधन सुरू आहे. सध्या विंचवाचं विष हे एक व्यावसायिक बाब झाली आहे आणि ती कोट्यवधींमध्ये विकली जाते. कॉस्मेटिक्स, वेदनाशामक तसंच रोगप्रतिकारकक्षमतेशी संबंधित औषधांसाठीही विंचवाचं विष वापरलं जातं.

मध्य आणि दक्षिण अमेरिकेत आढळणाऱ्या विंचवांचे विष हृदयाच्या बायपास सर्जरीमध्ये उपयुक्त ठरते. त्या विषामधील मार्गाटॉक्सिन हा घटक नवीन पेशी तयार करण्यास मदत करते. शास्त्रज्ञ सांगतात की, मार्गाटॉक्सिन हा घटक हृदयविकारावर उपचार करताना शिरेवर स्प्रे म्हणून वापरला जाऊ शकतो. ब्रिटीश हार्ट फाउंडेशनचे वैद्यकीय संचालक प्रोफेसर पीटर वेइसबर्ग सांगतात की, निसर्गातील एखादा घटक मनुष्यासाठी घातक असला तरी त्याचा उपचारांसाठी कसा उपयोग होऊ शकतो, याचं हे चांगलं उदाहरण आहे.

मेदिन ओरॅनलेर या विंचू पालकाकडे सध्या २० हजार विंचू असल्याचे ते सांगतात. त्यांना योग्य खानपानही दिले जाते. मेदिनी सांगतात की, एका विंचवाच्या नांगीत केवळ २ मिलिग्रॅम इतकंच विष असते. १ ग्राम व्हिसासाठी ३०० ते ४०० विंचू लागतात. विंचवाचे विष हे १ कोटी डॉलर्सच्या भावाने १ लिटर असे विकले जाते. म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये ८० कोटी रुपयाला १ लिटर होईल.

महत्वाच्या बातम्या
Bollywood: त्रिमुर्तीमधील खतरनाक खलनायक खऱ्या आयुष्यात आहे देवमाणूस, ‘या’ आजारावर करतो उपचार
National President: कोण होणार भाजपचे पुढील राष्ट्रीय अध्यक्ष? नड्डांचं काय होणार? वाचा संपुर्ण राजकीय समीकरण
Hinduism: हिंदू धर्मगुरू स्वीकारणार होता इस्लाम धर्म, पण मधुमेह आला आडवा, प्रकरण वाचून चक्रावून जाल
PHOTO: विजय देवरकोंडाने मिडीयासमोरच केलं ‘असं’ कृत्य, आता होतेय चित्रपट बॉयकॉट करण्याची मागणी