शिंदे- फडणवीस सरकारने लोककल्याणाच्या निर्णयांना गती देण्याचे ठरवले आहे. याचाच एक टप्पा नोकरभरतीचा निर्णय असणार आहे. पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीत नोकरभरतीचा प्रस्ताव सादर करा, असा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. कोरोनाकाळात थांबलेली नोकरभरतीची प्रक्रिया पुन्हा वेगाने सुरू करण्याकडे सरकारचा कल आहे. (1 lakh recruitment every month for these departments)
अनेक खात्यांमध्ये रिक्त पदांमुळे कामाचा ताण वाढत असून अनेक कामे गतीने होत नाहीत. त्यासाठी अनेक विभागांमध्ये रिक्त पदांसाठी नोकरभरती केली जाणार आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या २ लाख ७५ हजार पदे रिक्त आहेत. या पदांवर आरक्षणनिहाय भरती प्रक्रिया कशी होईल, याचा आराखडा तयार केला जाणार आहे.
महाराष्ट्रातील हजारो बेरोजगार तरुणांना यामुळे दिलासा मिळणार आहे. गृह विभाग, आरोग्य विभाग, महसूल, जलसंपदा आदी विभागांमध्ये नोकर भरती केली जाणार आहे. आरक्षणाचा निकष लावून यासंबंधीच्या जाहिराती तयार करून मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात येणार आहेत.
नोकरभरती सरकारने नियमित प्रक्रियेनुसार करावी. कंत्राटी पद्धतीने नोकरभरती होऊ नये, अशी मागणी देखील काही लोकांकडून केली जात आहे. शिंदे- फडणवीस सरकारला जो यासंबंधीचा आराखडा दिला जाणार आहे.
त्यामध्ये १४ ते १५ हजारात गृह विभागात, २४ हजार आरोग्य विभागात, १४ हजार जलसंपदा विभागात, ८ हजार बांधकाम विभागात, १४ हजार महसूल विभागात कर्मचारी भरती केली जाणार आहे.
जिल्हा परिषदेतील रिक्त जागांसाठीही कर्मचारी नेमले जाणार आहेत. बैठकीत हा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. सरकारच्या या मोठ्या निर्णयामुळे बेरोजगारीचा प्रश्न निकाली काढण्यात येणार असल्याचे दिसते. आता ऑगस्ट, सप्टेंबर ते नोव्हेंबर याकाळात दर महिन्याला १ लाख कर्मचारी भरती केले जाईल, असे बोलले जाते.
महत्वाच्या बातम्या-
‘दिपक केसरकर हा भामटा आणि लबाड माणूस, नारायण राणेंना घाबरून तो शिवसेनेत आला’
कारगिल युद्धावेळी कोणत्याही पदावर नसतानाही मोदी गेले होते थेट युद्धभूमीवर; अस्सल पुरावा आला समोर
वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाही एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना धक्का; पहा नेमकं काय म्हणालेत