Share

पुण्यात खळबळ! शिक्षकांसमोर वर्गात घुसून 10 वीच्या विद्यार्थिनीवर केले चाकूनं सपासप वार; आरोपी पसार

pune crime

पुणे शहर हे विद्येचे ‘माहेर घर’ म्हणून ओळखले जाते. परंतु पुण्यातून अनेकदा अशा धक्कादायक घटना समोर येतात की त्या वाचून आपल्याला देखील जबर धक्का बसतो. तसेच राज्यात एकतर्फी प्रेमातून हल्ले होण्याचे प्रमाण देखील अलीकडे चांगलेच वाढले आहे. अनेकांनी आपला जीव गमावला आहे.

अशीच एक खळबळजनक घटना पुणे शहरात घडली आहे. भरदिवसा एका माथेफिरू तरुणानं दहावीतल्या विद्यार्थिनीवर (10th standard student) चाकूनं हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेने सध्या पुणे शहर चांगलेच हदारले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हल्ला करून आरोपी भरार झाला आहे.

तसेच या हल्ल्यात विद्यार्थिनी जबर जखमी झाली आहे. एका पालकांच्या मदतीने तातडीने जखमी विद्यार्थिनीला वडगाव शेरी येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेने कुटुंबीयांना देखील मोठा धक्का बसला आहे.

तर जाणून घेऊया नेमकं प्रकरण काय? मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी 11 वाजता घटना घडली त्यावेळी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ सुरू होता. आरोपी तरुण हातात चाकू घेऊन विद्यार्थिनीच्या दहावीच्या वर्गात घुसला. आरोपीनं इतर विद्यार्थ्यांच्या समोर आणि शिक्षिकेच्या समोरच मुलीवर वार केले.

आरोपी तरुण दहावीच्या मुलीवर वार केल्यानंतर तेथून पसार झाला आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पालक जमले. या हल्ल्यात ती मुलगी जबर जखमी झाली आहे. त्यानंतर तिला तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेत्यात आले. सध्या वडगाव शेरी येथील एका खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, एकतर्फी प्रेमातून हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेने शाळेत भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच कुटुंबीयांना देखील धक्का बसला आहे. सध्या पोलिस आरोपीचा शोध घेत असून, हल्ल्याचे खरे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाहीये. या घटनेने पुन्हा एकदा पुणे शहर चांगलेच हादरले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
गुप्तधनाच्या लासेपोटी काका-काकीने दिला चिमुकल्याचा बळी, तीन तुकडे केले अन्.., पोलिसही हादरले
आघाडीत बिघाडी! …तर मी तुमची हाडे मोडेन; जितेंद्र आव्हाडांचा शिवसेनेला थेट इशारा
जेव्हा स्वत:च्याच लग्नात मंगळसूत्र घरी विसरला होता ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता, स्वत:च सांगितला फजितीचा किस्सा
‘या’ बाॅलीवूड अभिनेत्यांनी जीवनात केलाय जबरदस्त संघर्ष; केली आहेत वाॅचमन, वेटरची कामे

इतर क्राईम ताज्या बातम्या राज्य शिक्षण

Join WhatsApp

Join Now