Share

२४ वर्षीय तरुणी करणार स्वत:शीच लग्न, हनिमुनलाही जाणार एकटीच; जाणून घ्या काय आहे प्रकरण

आज समाजात कुटुंबव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी लोकांनी लग्नव्यवस्था भक्कम केली आहे. त्यासाठी लग्न करण्याचे प्रकार बदलले मात्र लग्न हे प्रत्येक व्यक्ती करताना दिसते. एका अनोख्या पद्धतीचा विवाह गुजरातच्या २४ वर्षीय तरुणीने करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ती सर्व देशात चर्चेचा विषय बनली आहे. ती करणार आहे. (kshama bindu, solo wedding, gujrat, first girl, honeymoon)

क्षमा बिंदू असे गुजरातमध्ये राहणाऱ्या त्या मुलीचे नाव आहे. क्षमा ११ जूनला लग्न करणार आहे. आपण पाहतो तसं वाजंत्री येतील, नवरी नटूनथटून मंडपात बसेल, मंगलअष्टका होतील, अक्षदा पडतील पण नवऱ्याने मुलाची वाजतगाजत मंडपात वरात येणार नाही. नवरीला सासरी घेऊन कोणी जाणार नाही.

बदलत्या काळानुसार लिव्ह इन रिलेशनशिप, कॉन्ट्रेक मॅरेज, अशा प्रकारचे लग्न तरुण मुलमुली आजकाल करतात. डेस्टीनेशन वेडिंग हा पण प्रकार फार लोकप्रिय आहे. पण क्षमा एकल लग्न करत आहे. म्हणजेच ती स्वत:शीच लग्न करत आहे. ज्याच्यावर प्रेम आहे, अशा व्यक्तीशी लोक लग्नगाठ बांधतात. परंतु क्षमा म्हणते माझे स्वता:वर प्रेम आहे. त्यामुळे मी स्वत:शी लग्न करत आहे.

मला कोणाशी लग्न करायचं नव्हतं पण नवरी बनायचं होतं. म्हणून मी एकल विवाहाचा निर्णय घेतला, असं क्षमाने सांगितलं. लग्नात देण्यासाठीची खास ५ वचने तिने लिहून तयार केली आहेत. ती म्हणते, लग्न करून स्वतःशी एकनिष्ठ राहायचं. प्रेम करायचं आणि आणि आपल्या स्वत:ची आयुष्यभर सोबत करायची. अशा प्रकारचे लग्न ही समाजाला नवीन गोष्ट आहे.

तिच्या लग्नासाठी तिने सुंदर लेहंगा घेतला आहे. ती मंगळसूत्र घालणार आहे. सप्तपदी, भांगेत कुंकू भरणे, कन्यादान हे सर्व पारंपारिक विधी तिच्या लग्नात होणार आहेत. लग्नाची सर्व जय्यत तयारी तिने केली आहे. मंडप सजेल पण तो फक्त नवरीसाठीच. क्षमाचे आई-वडील पुरोगामी विचारांचे असल्याने त्यांचा या लग्नाला पाठिंबा आहे, असे तिने सांगितले. ती लग्नानंतर गोव्याला २ आठवडे हनिमूनला पण जाणार आहे.

अशा प्रकारे लग्न करणारी क्षमा ही देशातली पहिलीच मुलगी आहे. ती म्हणते की, याआधी देशात कोणी सोलो वेडिंग केलं आहे, हे शोधण्याचाही मी प्रयत्न केला. मात्र, मला तेव्हा कोणीही सापडले नाही. मला वाटतं देशात स्वतःशीच लग्न करणारी मी पहिली मुलगी आहे. देशात स्वप्रेम हे उदाहरण देणारी मी पहिलीच मुलगी असेन.
महत्वाच्या बातम्या
नालंदातील ‘या’ गावात हिंदू लोक पढतात दिवसातून 5 वेळा अजान, कारण वाचून आश्चर्य वाटेल
पुण्याच्या उद्योगक्षेत्राला मोठा धक्का! प्रसिद्ध ‘प्रवीण मसाले’चे संस्थापक हुकमीचंद चोरडिया यांचे निधन
गाण्याचे शिक्षण घेतले नाही तरी केले ३५०० हून अधिक गाण्यांवर काम, वाचा केकेच्या न ऐकलेल्या गोष्टी
IPL 2023 साठी कर्णधार रोहित शर्माने फुकले रणशिंग, म्हणाला, संघातील एकजूटपणा पुढील वर्षी..

इतर ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now