आता लवकरात लवकरे बरे होणार कोरोना रुग्ण; Zydus cadila च्या ‘त्या’ औषधाला मंजूरी

देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. त्यामुळे रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुडवडा निर्माण झाला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सरकार वेगवेगळे निर्णय घेत आहे.

आता कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी केंद्राने झायडस कॅडीलाच्या विराफिन या अँटीव्हायरल औषधाला मंजूरी दिली आहे.

केंद्राने झायडस कॅडीलाच्या इंटरफेरॉन म्हणजेच विराफिन या अँटीव्हायरल औषधाला परवानगी दिली आहे. PegINF म्हणूनही हे औषध ओळखले जाते. कोरोना रुग्णांवर उपचारासाठी आपात्कालीन मंजूरी द्यावी, अशी मागणी कंपनीने ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडियाकडे केली होती.

त्यानंतर आता ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडियाने या औषधाला मंजूरी दिली आहे. या औषधामुळे कोरोना रुग्ण लवकरात लवकर बरा होतो, असा दावा कंपनीने केला आहे. तसेच या औषधाची कोरोना रुग्णांवर चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी ९१.१५ टक्के रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी ७ दिवसांतर निगेटिव्ह आली होती, असा दावाही कंपनीने केला आहे.

झायडस कॅडीला ही अहमदाबादमधील कंपनी आहे. हिपेटायटिस सी साठी हे औषध तयार करण्यात आले होते. १० वर्षांपुर्वी या यकृतासंबंधी आजारावर उपचारासाठी या औषधाला परवानगी देण्यात आली होती, त्यानंतर आता हे कोरोना रुग्णांवरही प्रभावी असल्याचे कंपनीने म्हटले आहे. त्यामुळे आता या औषधाला परवानगी मिळाल्याने कोरोना रुग्णही लवकरात लवकर बरे होणार आहे.

दरम्यान, देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दिवसाला लाखोंच्या संख्येत रुग्ण मिळत आहे. सलग तिसऱ्या दिवशी देशात तीन लाखांपेक्षा जास्त रुग्ण मिळाले आहे. तर गेल्या दहा दिवसात १५ हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे.

महत्वाच्या बातम्या-

राजकुमारला भेटण्यासाठी भितींवरून उडी मारून त्यांच्या घरात घुसला होता सलमान खान
कोरोना झालेल्या प्रसिद्ध पुजाऱ्याच्या मदतीला धावून आले असदुद्दीन औवेसी; केली मोठी मदत
साहेब तुम्ही काही करू नका, तुमचे कारखाने हवेतला ऑक्सिजनही सोडणार नाहीत; शरद पवारांवर टिकास्र

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.