दोन पोरांना सुचली मेन्युकार्ड वरुन भन्नाट आयडिया, आता करताय करोडोंची कमाई

 

नोकरी करुन सोडून व्यवसाय सुरु करण्याचा अनेक जण प्रयत्न करत असतात. पण यश त्यांनाच मिळते ज्यांची व्यवसाय करण्याची कल्पना भन्नाट असते. आजची ही गोष्ट अशाच एका स्टार्टअपची आहे.

दिपेंद्र आणि पंकज नावाच्या दोन तरुणांना ऑफिसमध्ये एक भन्नाट आयडिया सुचली आणि त्यांनी व्यवसाय सुरु केला. त्यांच्या या व्यवसायाने आता इतकी उंची गाठली आहे, की आता या व्यवसायातून ते करोडो रुपयांची कमाई करत आहे. हि कंपनी आहे झोमॅटो.

झोमॅटो खुप प्रसिद्ध कंपनी बनली आहे. ही कंपनी फुड सप्लाय करते. तुमच्या आजू बाजूला असणाऱ्या हॉटेलांमध्ये वेगवेगळे पदार्थ तुमच्यापर्यंत पोहचवण्याचे काम ही कंपनी करते.

दिपेंद्र गोयल आणि पंकज चढ्ढा आयआयटीची नोकरी करत होते. तेव्हा ऑफिसच्या कँटीनमध्ये त्यांना असे लक्षात आले की कँटीनमध्ये गर्दी असताना लोकांना लवकर मेन्युकार्ड मिळायचे नाही, तेव्हा त्यांनी एक वेबसाईट तयार केली. लोक त्या वेबसाईटवरच मेन्युकार्ड बघून घ्यायचे, त्यामुळे लोकांना लाईनमध्ये लागण्याची गरज पडायची नाही.

तसेच त्यांनी वेगवेगळ्या रेस्टॉरंटचे मेन्युकार्ड या वेबसाईटवर टाकण्यास सुरुवात केली. त्यांनी Foodiebay नावाने ही वेबसाईट सुरु केली होती. लोकांना ही आयडिया खुप आवडली.

त्यांनी वेगवेगळ्या शहरातल्या हॉटेलांचेही मेन्युकार्ड त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर अपलोड केले. पुढे त्यांनी यामध्ये र्डर करण्याचे सिस्टिम टाकण्यात आले. तसेच त्यांनी डिलिव्हरीचे कामे करण्यास सुरुवात केली, कंपनी वाढत होती, त्यामुळे पुढे त्यांनी या कंपनीचे नाव झोमॅटो असे करण्यात आले.

दिपेंद्र आणि पंकज यांच्या कंपनीला फंड मिळण्यास सुरुवात झाली आणि अशाप्रकारे ही कंपनी एक मोठा ब्रँड बनली. सध्या त्यांच्या कंपनीचे ६ कोटींपेक्षा जास्त ग्राहक आहे. तसेच ही कंपनी फक्त भारतातच नाही, तर जगभरात प्रसिद्ध झाले आहे. सध्या कंपनीची नेटवर्थ २२०० करोड इतकी आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.