झोमॅटोवरून मागवलेले जेवण रद्द का केले? म्हणत डिलिव्हरी बॉयने दिला तरूणीला ठोसा

आजकाल अनेकजण ऑनलाईन जेवण मागवतात. याचा फायदा असा होतो की आपल्याला घरबसल्या कोणत्याही ठिकाणचे जेवण घरपोच मिळते आणि तेही परवडणाऱ्या किंमतीत. असंच एका तरूणीने ऑनलाईन फुड डिलिव्हरी ऍप झोमॅटोवरून जेवण मागवले होते.

पण पुढे तिच्यासोबत जे घडले ते वाचून तुम्हाला धक्का बसेल. तिने ऑर्डर केलेले जेवण घेऊन डिलिव्हरी बॉय उशीरा आला होता. यानंतर त्या तरूणीने ती ऑर्डर कॅन्सल केली. तरीही तो डिलिव्हरी बॉय जेवण घेऊन तिच्या घरी पोहोचला होता.

परंतु तिने त्याला जेवण घेण्यास नकार दिला. हे ऐकून डिलिव्हरी बॉयला खुप राग आला आणि त्याने त्या तरुणीच्या नाकावर बुक्का मारला. त्यानंतर तरूणीच्या नाकातून रक्त वाहू लागले. त्यानंतर हे प्रकरण लोकांना तेव्हा कळले जेव्हा तिने याचा व्हिडीओ काढून सोशल मिडीयावर अपलोड केला आणि लोकांना याबाबत माहिती दिली.

त्यानंतर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. तिने घडलेला सगळा प्रकार सांगितला आहे. तिने मागवलेल्या ऑर्डरला उशीर झाल्याने तिने कस्टमर केअरला फोन केला. पण जेव्हा ती कस्टमर केअरशी फोनवर बोलत होती तेव्हा डिलिव्हरी बॉय तिच्या दारावर जेवण घेऊन पोहोचला.

तिने दरवाजा उघडला आणि ऑर्डर घेण्यास नकार दिला. त्यावेळी डिलिव्हरी बॉयने तिच्यासोबत वाद घालण्यास सुरूवात केली असे तिचे म्हणणे आहे. त्यानंतर डिलिव्हरी बॉय घरात शिरला आणि त्याने जेवण ठेवले.

ज्यावेळी तिने विरोध केला तेव्हा तो म्हणाला की मी तुमचा नोकर आहे का? असं विचारत त्याने तिच्या नाकावर एक बुक्का दिला, असा घटनाक्रम तिने सांगितला आहे. या प्रकरणानंतर तिची कोणीही मदत केलेली नाही.

तिने स्वता रुग्णालयात जाऊन उपचार घेतले आणि सध्या तिला नीट बोलताही येत नाहीये. लवकरच पोलिस त्या व्यक्तीला अटक करणार असल्याचे तिने सांगितले आहे. दरम्यान, झोमॅटो कंपनीने तरूणीची माफी मागितली आहे.

स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ते तिला लागेल ती मदत करणार आहेत. तसेच कंपनीने तरूणीला आश्वासन दिले आहे की संबंधित व्यक्तीवर लवकरच कारवाई करणार आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.