Share

Zia Ansari : कुख्यात गुंडांने जेलमधून बाहेर येताच कापला ८ गुन्ह्यांची कलमे लिहिलेला केक, पुढचा गुन्हा, पुढचं कलम कोणतं?

Zia Ansari : आजच्या सोशल मीडियाच्या युगात गुन्हेगारी कृत्यांना प्रसिद्धीच्या झोतात आणण्याचं प्रकार वाढीस लागले आहेत. गुन्हेगारी(Crime) पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना ‘भाई’, ‘डॉन’, ‘बादशाह’ अशा बिरुदांनी गौरवून त्यांचे व्हिडिओ(video) आणि रील्स(reel) सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. यामुळे तरुणांमध्ये गुन्हेगारी जीवनशैलीकडे आकर्षण वाढत असून, पोलिसांचा वचक आहे की नाही, असा प्रश्न जनतेसमोर उभा राहत आहे.

या पार्श्वभूमीवर भांडुपमधील एका गुन्हेगाराचा वाढदिवस(birthday) सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. झिया अन्सारी(Zia Ansari) या कुख्यात गुंडाने आपल्या वाढदिवसानिमित्त जेवढे गुन्हे केले आहेत, त्याची कलमे(Sections) केकवर(cake) छापून तो ‘साजरा’ केला. विशेष म्हणजे अलीकडेच जामिनावर सुटलेला झिया अन्सारी आठ गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी आहे.

वाढदिवसाच्या केकवर “पुढचा गुन्हा काय?” असा प्रश्नही मांडण्यात आला होता, ज्यातून पुन्हा दहशतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचं स्पष्ट होतं. या ‘गुन्हेगारी केक’चे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.

याची गंभीर दखल घेत भांडुप पोलिसांनी कारवाई सुरू केली असून, झिया अन्सारीला तडीपार करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. या प्रकारावरून गुन्हेगारीचं उदात्तीकरण थांबवण्यासाठी अधिक कठोर पावलं उचलण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
zia-ansari-cut-a-cake-with-8-criminal-sections-written-on-it-upon-returning-from-jail

क्राईम ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now