‘जहर’ चित्रपटातील ‘ही’ अभिनेत्री आठवते का? आज झाली आहे अशी अवस्था

फिल्म इंडस्ट्रीमध्ये रातोरात स्टारडम मिळते. तर कधी कधी अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर कलाकारांना यश चाखायला मिळते. रातोरात स्टार झाल्यानंतर ते स्टारडम टिकवून ठेवणे खुप कठिण असते. म्हणूनच काही कलाकार इंडस्ट्रीमध्ये पहील्या चित्रपटानंतर स्टार झाल्यानंतर फ्लॉप होतात.

ही गोष्ट जास्त करुन अभिनेत्रींसोबत घडते. अभिनेत्री रातोरात स्टार बनतात. पण त्यानंतर मात्र त्यांच्या करिअरला उतरती कळा सुरु होते. करिअर खराब होऊ लागल्यानंतर अनेक अभिनेत्री इंडस्ट्रीला रामराम ठोकतात आणि लग्न करुन संसाराला लागतात.

अशाच एका अभिनेत्रीबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या अभिनेत्रीचे नाव आहे उदिता गोस्वामी. खुप कमी लोकांना हे नाव माहीती असेल. कारण उदिताने खुप कमी वेळातच इंडस्ट्री सोडली होती. चित्रपटांमध्ये यश न मिळाल्यामूळे तिने हा निर्णय घेतला होता.

उदिताचा जन्म ९ फेब्रूवारी १९८४ ला झाला होता. खुप कमी वयात तिने फॅशन इंडस्ट्रीमध्ये प्रवेस केला होता. सोळाव्या वर्षी उदिता फॅशन इंस्टिट्यूट वॉक करु लागली होती. त्यानंतर काही दिवसांनी ती मुंबईला आली मोठ्या फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक करु लागली.

फॅशनमध्ये चांगले यश मिळू लागल्यानंतर उदिता मुंबईला आली आणि तिने फॅशन शोसोबतच अभिनयात येण्याची तयारी सुरु केली. उदितासाठी बॉलीवूडमध्ये डेब्यू करणे सोपे नव्हते. तिला यासाठी अनेक वर्ष मेहनत घ्यावी लागली होती.

अनेक दिवसांच्या मेहनतीनंतर तिने उदिताला एक चित्रपट मिळाला होता. पण या चित्रपटात अनेक बोल्ड सीन्स होते. पण करिअरसाठी उदिताने पहील्याच चित्रपटामध्ये अनेक बोल्ड सीन्स दिले. २००३ मध्ये रिलीज झालेल्या ‘पाप’ चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.

चित्रपट फ्लॉप झाला असला तरी उदिता मात्र तिच्या बोल्ड सीन्समूळे चांगलीच चर्चेत आली होती. त्यामूळे तिला चित्रपट मिळत होते. पाप चित्रपटानंतर उदिताचा ‘जहर’ चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात उदिताने तिच्या बोल्डनेसने आग लावली होती.

जहर चित्रपटाती उदिताचे अनेक सीन्स खुपच बोल्ड होते. या चित्रपटाच्या एका पोस्टरसाठी उदिताने बॅकसेल फोटोशुट केले होते. ज्याची त्यावेळी खुप जास्त चर्चा झाली होती. या चित्रपटाच्या शुटींग अजून एक चांगली गोष्ट झाली होती. ती म्हणजे उदिताला तिचा जीवनसाथी मिळाला होती.

दिग्दर्शक मोहित सुरी आणि उदिताची पहीली भेट याच चित्रपटाच्या सेटवर झाली होती. पहील्याच भेटीत दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. नऊ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केले. वैयक्तिक आयूष्यात सगळे नीट सुरु असले तरी तिचे प्रोफेशनल आयूष्य मात्र खराब सुरु होते.

अनेक प्रयत्न करुन देखील उदिताला बॉलीवूडमध्ये यश मिळाले नाही. जहर चित्रपटानंतर उदिताचे अगर, किससे प्यार करु असे चित्रपट रिलीज झाले. पण तिला अभिनेत्री म्हणून खास यश मिळाले नाही. चित्रपटांमध्ये अनेक बोल्ड सीन्स देऊन देखील ती यशस्वी होऊ शकली नाही.

शेवटी उदिताने फिल्म इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय़ घेतला. २०१३ मध्ये मोहित सुरीसोबत लग्न करुन ती नेहमीसाठी अभिनय क्षेत्रापासून दुर गेली. बॉलीवूडच्या सर्वात हॉट अभिनेत्रींमध्ये पैकी एक उदिता गोस्वामी आज फिल्म इंडस्ट्रीपासून दुर आहे. ती तिच्या संसारात व्यस्त आहे.

महत्वाच्या बातम्या –
अक्षय कुमारची बायको ट्विंकल खन्नाच्या प्रेमात पडला होता ‘हा’ दिग्दर्शक; काहीही करायला होता तयार
उद्योगपतीच्या अंत्यसंस्कारात रडण्यासाठी चंकी पांडेला होती ५ लाखांची आॅफर, स्वत:च केले सर्व उघड
…म्हणून जुही चावलाने आमिर खानला किस करायला दिला होता सरळ सरळ नकार
साऊथची टॉपची अभिनेत्री तृषा आणि राणा दग्गूबत्तीचे ‘या’ कारणामूळे होऊ शकले नाही लग्न

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.