आईकडूनच घेतला अभिनयाचा धडा! ‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील शलाका आहे ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी..

झी मराठी वाहिनीवरील ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेने अल्पावधीच प्रेक्षकांची मने जिंकली आहे. मालिकेला अगदी कमी कालावधीच प्रचंड प्रदिसाद मिळताना पाहायला मिळत आहे. या मालिकेत आपल्याला मुख्य भूमिकेत अभिनेत्री दीपा दुर्गुळे आणि अभिनेता अजिंक्य राऊत पाहायला मिळत आहे.

या मालिकेत देशपांडे कुटुंबात शलाका, सानिका आणि दीपा अशा तीन मुली दाखवल्या आहेत. लवकरच शलाका लग्न करून अमेरिकेला जाणार असल्याने देशपांडे कुटुंबात तिच्या लग्नाची जोरदार तयारी पाहायला मिळत आहे. मात्र शलाकाच्या सासरच्यांकडून त्यांच्या लग्नासाठी नको ती मागणी केली जात आहे.

मध्यमवर्गीय देशमुख कुटुंबाला शलाकाच्या लग्नासाठी अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यांनी जमवलेले पैसे देखील तुटले आहे, त्यामुळे शलाकाच लग्न होणार की नाही असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहे. मालिकेत शलाकाचे पात्र थोडेसे घाबरट आणि रडूबाई प्रमाणे दाखवले आहे.

शलाकाच पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीच नाव शर्वरी कुलकर्णी आहे. शर्वरीने ‘आनंदी हे जग सारे’ ह्या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. यात तिने मीरा ची भूमिका साकारली होती. या मालिकेतील भूमिकेमुळे देखील तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती.

शर्वरी उत्तम डान्सर असून अभिनयाचे तिने धडे गिरवले आहेत. नाटकांमधूनही ती याआधी प्रेक्षकांसमोर आली होती. शर्वरी कुलकर्णी ही मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री ‘संपदा कुलकर्णी’ यांची मुलगी आहे. संपदा कुलकर्णी या मराठी चित्रपट, मालिका तसेच नाट्य अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. अनेक मंचावरून त्यांनी सुत्रसंचालिकेची भूमिका देखील निभावली आहे.

सध्या संपदा कुलकर्णी अभिनय क्षेत्रापासून लांब आहेत. त्या आपले पती राहुल कुलकर्णी यांच्यासोबत कोकणातील गावी राहत आहे. तिथे त्या शेती क्षेत्रात गुंतलेल्या पाहायला मिळत आहेत. ‘आनंदाचं शेत’ या माध्यमातून त्या इतरांना देखील शेती व्यवसायात येण्यास प्रोत्साहन देत आहेत.

शर्वरीने देखील आईच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात चांगलाच जम बसवला आहे. तिची ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेतील शलाकाच पात्र प्रेक्षकांना आवडत असलेलं पाहायला मिळत आहे. तसेच या मालिकेत अरुण कदम, रुपलक्ष्मी चौगुले, पूर्णिमा तळवळकर यांच्यासारखे अनेक दिग्गज कलाकार आहेत.

हे ही वाचा-

अमेरिकेतील लाखोंची नोकरी सोडून तरुणाने घेतल्या गाई, आता कमवतोय ३७ लाख रुपये, वाचा

पंडित जवाहरलाल नेहरूंच्या काळातील मंत्रिमंडळ हे आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट मंत्रिमंडळ- राज ठाकरे

मुलाचे चित्रपट कमवतात ४०० कोटी परंतु वडील आजही चालवितात बस; जाणून घ्या कारण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.