फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना कलाकारांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. विशेष करून अभिनेत्रींना अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते. असाच एक घाणेरडा प्रकार म्हणजे कास्टिंग काऊच. बॉलीवूडमध्ये अनेक अभिनेत्रींना कास्टिंग काऊचचा सामना करावा लागतो.
या गोष्टीबद्दल इंडस्ट्रीमध्ये सर्वांना माहिती आहे. परंतु खुप कमी लोकं या गोष्टीचा स्वीकार करतात. अभिनेत्रींमध्ये तर खुप कमी अशा अभिनेत्री आहेत ज्या या गोष्टीवर बिंधास्तपणे बोलत असतात. अशीच एक अभिनेत्री म्हणजे जरीन खान.
फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये जरीनच्या नावाचा समावेश होतो. तिने सलमान खानसोबत ‘वीर’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यु केला होता. हा चित्रपट काही खास कमाल करू शकला नाही.
म्हणून जरीनला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तिला चित्रपटांमध्ये काम मिळत नव्हते. एवढेच नाही तर तिला सुरुवातीच्या दिवसांमध्ये कास्टिंग काऊचसारख्या गोष्टीचा सामना करावा लागला होता. तिने स्वतः या गोष्टीचा खुलासा केला आहे. ती आज ३२ वर्षांची आहे.
जरीनने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, तिला सुरुवातीला अनेक वेळा कास्टिंग काऊचसारख्या घाणेरड्या प्रकाराचा सामना करावा लागला. पण ती कधीही त्या रस्त्यावर गेली नाही. तिने मेहनत करून पुढे जाणं स्वीकार केले.
जरीन खान म्हणाली की, ‘जेव्हा मी पहिल्यांदा चित्रपट क्षेत्रात आले. त्यावेळी मला दिग्दर्शकाने त्याच्यासोबत किसिंग सीनचा सराव करायला सांगितले. त्यावेळी मी चित्रपटात काम करायला नकार दिला’.
तिने अजून एक अनुभव सांगितला. ती म्हणाली की, ‘सुरुवातीच्या दिवसांमध्ये मला चित्रपटांच्या दिग्दर्शकांनी त्याच्यासोबत झोपायला सांगितले होते. तिने या गोष्टीला सरळ सरळ नकार दिला आणि चित्रपट सोडून दिला’.
जरीनने बॉलीवूडमध्ये प्रवेश केला. त्यावेळी तिला हे अनुभव आले होते. त्यानंतर ती या गोष्टीवर मोकळेपणाने बोलली. तिने तिचा अनुभव सर्वांना सांगितला. तिच्या या अनुभवातून दुसऱ्या अभिनेत्री खुप काही शिकल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या –
‘या’ अभिनेत्रींचे पती आहेत ७०० कोटीं पेक्षा अधिक संपत्तीचे मालक
अभिनयासोबतच ‘हा’ व्यवसाय करते बिपाशा बासू; वर्षाला कमावते करोडो रुपये
‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेत हेमाची भुमिका साकारणारी अभिनेत्री नक्की आहे तरी कोण?
८० च्या दशकातील टॉपच्या अभिनेत्री पुनम ढिल्लों अचानक फिल्म इंडस्ट्रीतून गायब का झाल्या ?