Yuzvendra Chahal : भारतीय संघाचा आघाडीचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलच्या आयुष्यात कदाचित सर्व काही सुरळीत होत नाहीये. चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा इन्स्टाग्रामवर सतत रोमँटिक फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत होते, परंतु गेल्या काही दिवसांपासून सर्वकाही बदललेले दिसत आहे.
रिपोर्टनुसार, दोघांमध्ये सर्व काही ठीक चालले नाही. काही दिवसांपूर्वी चहलने एक इन्स्टा स्टोरी शेअर केली होती, ज्यामध्ये लिहिले होते- न्यू लाईफ लोडिंग. या बातम्यांदरम्यान धनश्री वर्माने एक भावनिक पोस्ट केली आहे. तिचे दोन फोटो शेअर करण्यासोबतच धनश्रीने लिहिले – एक राजकुमारी नेहमीच तिच्या दुखःला शक्तीमध्ये बदलते.
युझवेंद्र चहलनेही ही पोस्ट लाईक केली आहे. दोघांचे २०२० मध्ये लग्न झाले होते. धनश्री एक डॉक्टर आणि डान्स कोरियोग्राफर आहे. ती तिच्या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. यापूर्वी धनश्री वर्माने इन्स्टाग्रामवरून युजवेंद्र चहलचे आडनावही काढून टाकले होते.
तेव्हापासून या दोघांमध्ये सर्व काही सुरळीत होत नसल्याचा अंदाज लावला जात होता. सोशल मीडियावर यूजर्स दोघांसाठी वेगवेगळ्या गोष्टी बोलत आहेत. दोघे वेगळे होणार असल्याचा दावा अनेकांनी केला आहे. मात्र, चहल किंवा धनश्री यांच्याकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही.
धनश्री लॉकडाऊनमध्ये ऑनलाइन डान्स क्लासेस देत असे. युझवेंद्र चहलने सांगितले होते की, तो धनश्रीच्या क्लासमध्ये सहभागी झाला होता. तिथेच दोघांची भेट झाली. भेटल्यानंतर तीन महिन्यांतच दोघांचीही एंगेजमेंट झाली. चहल आणि धनश्रीचे डिसेंबर २०२० मध्ये लग्न झाले होते.
महत्वाच्या बातम्या
Instagram: धनश्री-युजवेंद्र चहलमध्ये बिनसलं? इन्स्टाग्रामवरून हटवलं चहल आडनाव, घटस्फोटाच्या चर्चांना उधाण
एकमेकांना मिठी मारत खुल्लम खूल्ला प्रेम करताना दिसले युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा, बघा व्हायरल फोटो
VIDEO: बायकोला बाहेर जेवायला घेऊन गेला युजवेंद्र चहल, पुढे जे घडलं ते पाहून पोट धरून हसाल